हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या जबरदस्त फीचर्स आणि आकर्षक डिझाईनमुळे लोकांमध्ये iPhone खूपच लोकप्रिय बनला आहे. महागड्या या फोनचे अनेक नवीन व्हर्जन बाजारात दाखल झाले आहेत. मात्र, महाग असूनही याची क्रेझ वाढतच आहे. जर आपणही आयफोनचे चाहते असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयोगाची ठरू शकेल. कारण आज आपण एका अशा स्कॅमबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. अनेक लोकांना तर आपल्या सोबत झालेल्या या घोटाळ्याचा सुगावा देखील लागत नाही. हे लक्षात घ्या कि, सध्या बाजारात अनेक iPhone चे बनावट मॉडेल्स अगदी बिनधास्तपणे विकले जात आहेत. मात्र आज आपण बनावट आयफोन ओळखण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या काही सोप्या युक्त्या जाणून घेणार आहोत.
डिझाईन : iPhone मध्ये प्रीमियम डिझाइन दिले जाते. जे बनवण्यासाठी उच्च दर्जाचे साहित्य वापरले जाते. मात्र बनावट आयफोनमध्ये स्वस्त दर्जाचे साहित्य वापरले जाते. यावरूनही आपल्याला बनावट आयफोन ओळखता येईल.
परफेक्शन : जर आपण आयफोन विकत घेतला असेल आणि तो एकदम परफेक्ट दिसत असेल तर त्यामध्ये काहीतरी गडबड असू शकेल. खरं तर, बनावट आयफोन बनवणाऱ्या कंपन्या काही गोष्टी एकदम परफेक्ट बनवतात, ज्या खऱ्या आयफोनमध्ये दिसत नाहीत. अशाप्रकारे याद्वारे देखील आपल्याला बनावट आयफोन ओळखू शकतात.
फोटोची क्वालिटी : इतर स्मार्टफोनपेक्षा iPhone मधील फोटोची क्वालिटी खूपच चांगली येते. यासाठी आयफोनमध्ये असे काही फीचर्स दिले गेले आहेत. ज्यामुळे फोटोचा दर्जा वाढतो. मात्र जर बनावट आयफोन असेल तर फोटोची क्वालिटी खराब येते.
परफॉर्मन्स : इतर कोणत्याही स्मार्टफोनच्या तुलनेत iPhone खूप चांगला परफॉर्मन्स देतो. जर आपण आयफोन विकत घेतला असेल आणि आपल्याला त्याचा परफॉर्मन्स किंवा स्पीडच्या बाबतीत काही अडचण जाणवत असेल तर आपला आयफोन बनावट असू शकेल. अशा परिस्थितीत, आयफोनचा स्पीड आणि स्मूथनेस पाहून बनावट आयफोन ओळखता येईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.apple.com/in/iphone/
हे पण वाचा :
Bank Loan : नवीन वर्षात ‘या’ दोन बँकांनी ग्राहकांना दिला मोठा झटका, आता कर्ज घेणे महागले
‘या’ Post Office योजनेमध्ये गुंतवणूक करून दरमहा मिळवा 2500 रुपये
New Business Idea : टोमॅटो केचपच्या व्यवसायाद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
Indian Overseas Bank च्या FD वरील व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवीन दर
Train Cancelled : आज रेल्वेकडून 261 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा