फलटण | फलटण येथील आयुर उद्योग समूहाचे संस्थापक दिगंबर आगवणे यांनी लोणंद पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नानंतर आगवणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तेथून त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दिगंबर आगवणे आणि माढा मतदार संघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात गेले काही महिने जुन्या व्यवहारातून वाद सुरू होते. यामधून दोघांनी एकमेकांवर गुन्हे देखील नोंद केले आहेत. आता आत्महत्या करण्याच्या प्रयत्नामुळे पुन्हा रणजितसिंह नाईक यांच्यावर आरोप होवू लागले आहेत.
दरम्यान, आगवणे यांच्या आत्महत्या प्रयत्नानंतर त्यांना लोणंद येथील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. या घटनेनंतर आगवणे यांच्या मुलागा तुषार आगवणे याने खासदार रणजीतसिंह नाईक- निंबाळकर आणि पोलिस प्रशासन या घटनेला दोषी असल्याचे संदेश समाज माध्यमातून व्हायरल केले.