भिमा कोरेगाव मॅनेज केलेले प्रकरण, चांगले कार्यकर्ते अजूनही तुरूंगात – दिग्विजय सिंह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | भिमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणी मागील सरकारने मला अर्बन नक्सल ठरवले होते. भिमा कोरेगाव प्रकरण हे मॅनेज केलेले प्रकरण आहे. चांगले कार्यकर्ते अजूनही खोट्या खटल्यांत तुरूंगात आहेत असा आरोप काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले आहेत.

भिमा कोरेगाव प्रकरण घडले तेव्हा पोलिस अधिकार्‍यांनी मला फोन केला होता. या प्रकरणात ते मला मदत करतील असं ते म्हणाले होते. मात्र जेव्हा मी माझ्यावर खटला चालवावा असे सांगितले तेव्हा त्यांनी मला पुन्हा कधीच संपर्क केला नाही. मी कोणत्याही एजन्सीला हे सांगायला तयार आहे. सर्व व्यवस्थापित प्रकरणांकडे लक्ष देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सेवानिवृत्त हायकोर्ट न्यायाधीशांची नेमणूक करावी अशी मागणीही सिंह यांनी केली आहे.

मागील सरकारने मला भिमाकोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणी अर्बन नक्सल म्हणून घोषित केले होते. यावरुन हे सिद्ध होते की सदर प्रकरण मॅनॅज केलेले आहे आणि यात चांगले कार्यकर्ते अजूनही तुरूंगात आहेत. त्यांना न्याय कधी मिळणार म्हणत सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना टॅग केलं आहे.

महाराष्ट्रात स्नॅपिंग आणि टॅप करण्यामागे कोणाचा हात होता याची माहिती ठाकरे सरकार लोकांकडे देणार आहे का? या प्रकरणात
महाराष्ट्र सरकारचे कोणते अधिकारी सहभागी होते? इस्राइला सोफ्टवेअर आणण्यासाठी कोण गेले होते? आदी प्रश्नांची उत्तरे शोधने महत्वाचे आहे असेही सिंह यांनी म्हटले आहे.