हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागपुरातील दीक्षाभूमी (Dikshabhumi Nagpur) हे पूर्व विदर्भातील प्रसिद्ध ठिकाण आहे. बौद्ध धर्मियांसाठी हे पवित्र स्थळ महत्वाचे मानले जाते. दरवर्षी दीक्षाभूमीला लाखो लोक महाराष्ट्र आणि देशातून भेट देण्यासाठी येत असतात . त्यामुळे दिक्षाभूमी महत्वाचे धार्मिक पर्यटन क्षेत्र बनलेले आहे. दीक्षाभूमीचे महत्व लक्षात घेऊन ह्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी शासनाने दीक्षाभूमीला अ – दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रफळाचा विकास करण्याची जवाबदारी आता NIT ला देण्यात आली आहे. त्यानुसार ह्या क्षेत्रासाठीचा विकास आराखडा तयार करून दीक्षाभूमीचा विकास केला जाणार आहे.
विकासासाठी 200 कोटींचा निधी
विकास आराखड्यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विकास कार्यासाठी टेंडर देखील काढण्यात आले आहे. दीक्षाभूमीच्या विकासासाठी 22.80 एकर जमीन वापरली जाणार आहे. परिक्रमा मार्गासाठी दीक्षाभूमीजवळील केंद्रीय कापूस सुधार संस्थेची ३.८४ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी विकास कामासाठीचे उदघाटन करण्यात येणार आहे.
विकास आराखडा कसा असेल
धम्मचक्र प्रवर्तन दिनी होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोठा स्टेज बांधण्यात येणार आहे. सध्याच्या पार्किंगच्या जागेच्या जागी भूमिगत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये 400 कार, 1000 दुचाकी आणि 1000 सायकलींसाठी पार्किंगची सुविधा असेल.मुख्य स्तूपाच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रवेशद्वाराची रुंदी वाढवण्यात येणार आहे. स्तूपाभोवती परिक्रमा मार्ग बांधण्यात येणार आहे. त्याच्या शेजारी एक खुला हॉल असेल. संपूर्ण परिसर फुलांच्या झाडांनी आणि हिरवाईने व्यापलेला असेल.