फुकटची बिर्याणी महिला पोलीसाला पडणार महागात; गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील महिला DCP ने फुकट बिर्याणी साठी केलेला हट्ट आता त्यांच्याच अंगलटी येण्याची शक्यता आहे. आपल्याच हद्दीतील हॉटेल वाल्याला पैसे का द्यायचे असे म्हणत पोलीस कर्मचाऱ्याला फुकट बिर्याणी आणायला सांगणाऱ्या या महिलेची आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत

मी ती ऑडिओ क्लिप ऐकली असून निश्चितच हि गंभीर गोष्ट आहे. मी पोलीस आयुक्तांना सांगितले आहे कि यासंदर्भामधे चौकशी करून अहवाल द्यावा. त्या अहवाला नंतर राज्य सरकार या प्रकरणी योग्य तो निर्णय घेईल असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले

काय आहे प्रकरण –

पुण्यातील महिला DCP ने कर्मचाऱ्यांकडे फुकट बिर्याणीची मागणी केली .आपल्याच हद्दीतील हॉटेल मालकाकडून आपण पैसे देऊन बिर्याणी का घ्यायची असा सवाल महिला पोलिसने केला असता कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याच सांगतोय. अशावेळी मॅडम त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं रेकॉर्डिंग मध्ये दिसत आहे. हे रेकॉर्डिंग सध्या जोरदार व्हायरल होत असून आता खुद्द गृहमंत्र्यांनी याबाबात चौकशीचे आदेश दिल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत