बॉलीवूड अभिनेते दिलीपकुमार यांचे भाऊ अस्लम खान यांच निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हे वर्ष बॉलिवूडसाठी खूप वाईट गेले आहे. एकामागून एक बरेच मोठे कलाकार आपण या वर्षी गमावले. त्याचबरोबर आता हिंदी सिनेमाचे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांकडून मोठी बातमी समोर येत आहे. दिलीप कुमारचा धाकटा भाऊ असलम खान यांचे निधन झाले आहे. अस्लम खान यांचे आज सकाळी निधन झाले.त्यांना मधुमेह तसेच हृदयविकाराचा त्रास होता.

त्यांच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. अस्लम खान यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

अलीकडेच दिलीप कुमारचा धाकटा भाऊ एहसान खान आणि अस्लम खान या दोघांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. अस्लम आणि एहसान खान दोघांनाही दम्याचा त्रास होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. दोघांना व्हेंटिलेटरच्या आधारावर ठेवण्यात आले होते.

एहसान खान 90 वर्षांचे आहेत, तर अस्लम खान त्याच्यापेक्षा काही वर्षांनी लहान होते. रविवारी कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दिलीपकुमारची पत्नी सायरा बानो यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’