हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावती लोकसभा मतदार (Amravati Lok Sabha 2024) संघासाठी भाजपने नवनीत राणा (Navneet Rana) याना उमेदवारी दिल्यानंतर महायुतीतील घटक पक्ष असलेले प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bachhu Kadu) नाराज झाले होते. कोणत्या परिस्थितीत नवनीत राणा यांचे काम करणार नाही, याउलट प्रहार कडून (Parahar Sanghatna) सक्षम उमेदवार अमरावती लोकसभेसाठी देण्यात येईल असं बच्चू कडू यांनी म्हंटल होते. अखेर त्यांनी आपला शब्द खरा करत नवनीत राणा यांच्याविरोधात डाव टाकलाच… कारण प्रहार कडून अमरावती लोकसभा मतदार संघासाठी दिनेश बूब यांचे नाव जाहीर केलं आहे. दिनेश बाबू हे ठाकरे गटाचे नेते होते, त्यांचा प्रहार पक्षामध्ये प्रवेश करत त्यांना तिकीट देण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना प्रहारचे आमदार राजकुमार पटेल म्हणाले की, अमरावतीत प्रहार संघटनेकडून उमेदवार उतरवण्यात यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. माझ्यावर बच्चू कडूंनी जबाबदारी दिली. त्यामुळे आम्ही दिनेश बूब याना अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहोत. अमरावतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल असेही राजकुमार पटेल यांनी सांगितलं.
जिल्ह्याच्या हितिहासासाठी मी निवडणुकीत उभा- दिनेश बूब
दरम्यान, जिल्ह्याच्या हितिहासासाठी मी निवडणुकीत उभा आहे अशी प्रतिक्रिया दिनेश बूब यांनी दिली. आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक असून मी आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय घेतलाय. आमच्या चार पिढ्या या सामाजिक कार्यात आहे, त्यामुळे अनेक लोकांनी मला फोन केले कि निवडणुकीला उभं राहा. जर अमरावतीच्या जनतेने लोकसभा निवडणुकीत मला निवडून दिल तर चुकीच्या लोकांना निवडून दिल याचा पश्चाताप जनतेला होणार नाही. मतदारांना अभिमान वाटेल असेच काम मी करेन असं दिनेश बूब यांनी म्हंटल.