टीम हॅलो महाराष्ट्र। जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जेएनयु) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून देशभरात निदर्शन पाहायला मिळत आहेत. या निदर्शनात सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,साहित्य,कला अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती या निदर्शनात सामील होऊन किंवा सोशल मीडियावर व्यक्त होत या हल्ल्याच्या विरोधात विद्यार्थ्यांसोबत उभी राहताना दिसत आहेत. यासर्वामध्ये आता बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण सुद्धा सामील झाली आहे.
काल रात्री दीपिका जेएनयुतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थानात विद्यापीठात पोहचली होती. यावेळी हल्ल्यातील जखमी विद्यार्थ्यांची तिने भेट घेत आपला पाठींबा विद्यार्थी आंदोलनाला दर्शविला. दरम्यान,दिपीकाच्या जेएनयु भेटीचे सोशल मीडियावर वायरल झाल्यावर अनेकांनी जसे तिच्या या कृतीचे कौतुक केलं त्याचप्रमाणे सोशल मीडियावर तिला आता ट्रोल सुद्धा केलं जात आहे.
याचाच भाग म्हणून दीपिकाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दीपिका एका मुलाखतीत राहुल गान्धी यांच्याविषयी विचारलेल्या एका प्रश्नावर आपलं मत सांगताना दिसत आहे. राजकारणापासून स्वतःला दूर ठेवणाऱ्या दीपिकानं काही वर्षांपूर्वी या मुलाखतीत सांगितलं होतं, मला राजकारणाबद्दल फार काही माहित नाही. पण जे काही मी टीव्हीवर पाहते त्यावरुन मला वाटतं राहुल गांधी आपल्या देशासाठी जे काही करत आहेत ते आपल्या देशासाठी एक चांगलं उदाहरण आहे. ते आपल्या देशासाठी खूप काही करत आहेत. मला वाटतं ते एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील. दीपिकाचा हाच जुना व्हिडिओ तिला सोशल मीडियावर ट्रोल करताना मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.
विडिओ सौजन्य- Manoj Tibrewal (youtube)