प्रिय ट्रोलर्स, तुम्ही कितीही खोटं बोललात तरी ‘छपाक’ यशस्वी झालाय..!! पहा सविस्तर आकडेवारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील तणावग्रस्त राजकीय परिस्थितीत प्रश्न विचारणाऱ्यांना ट्रोल केलं जाण्याचं काम सुरु आहे. सिनेसृष्टी, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांना याचा फटका बसत असल्याचं मागील ५ ते ६ वर्षांत समोर आलं होतं. याचं ताज उदाहरण म्हणजेच दीपिका पदुकोणचा छपाक हा चित्रपट. ऍसिड हल्लाग्रस्त लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाची योग्य प्रसिद्धी चालू असताना, जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी दीपिका जेएनयूत गेली आणि नंतर एकच खळबळ उडाली.

सिनेकलाकार स्वतःचा स्वार्थ पाहून भूमिका बदलतात असं बोललं जात असताना दीपिका मात्र घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहिली. या घटनेनंतर सत्ताधारी पक्षाच्या आयटी सेलकडून दीपिकाला लक्ष करण्यात आलं. चित्रपट बंद पाडण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. या सर्वांना पुरुन उरत ‘छपाक’ने बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडली आहे.

प्रिंट आणि डिजीटल माध्यमातील प्रसिद्धी खर्चासहित छपाक बनवण्यासाठी एकूण ३५ करोड रुपये खर्च करण्यात आला होता. चित्रपटाच्या निर्मितीमध्ये दीपिका, मेघना गुलजार, गोविंद सिंग संधू आणि फॉक्स स्टार स्टुडिओ यांचा सहभाग होता. छपाकने भारतातील तिकीट विक्रीतून यातील जवळपास ३२ कोटी रुपये परत मिळवले आहेत. याशिवाय संगीताच्या हक्क विक्रीतून ३ कोटी आणि सॅटेलाईट अधिकारांचे २३ कोटी असे ५८ कोटी रुपये चित्रपटाने आतापर्यंत कमावले आहेत. शिवाय जगभरात झालेल्या तिकीटविक्रीतून १५ कोटींचा गल्ला छपाकने जमवला आहे. एकूणच जगभरात छपाकने ७० कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला असून यामुळे छपाक आणि दीपिकाच्या ट्रोलर्सला सणसणीत चपराक मिळाली आहे.

याआधी दीपिकाच्या पद्मावत चित्रपटालाही अशाच विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. त्या चित्रपटानेही २०० कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र त्यामध्ये दीपिका, रणवीर आणि शाहिद अशी मोठी स्टारकास्ट होती. शिवाय देशातील ३५०० स्क्रीनवर हा चित्रपट दाखवण्यात आला होता. छपाक हा व्यावसायिक चित्रपट नसताना आणि १७०० स्क्रीनवर दाखवला जाऊनही ७० कोटींच्या पार गेल्याने मेघना गुलजार आणि दीपिका यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाल्याचं बोललं जात आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा “HelloNews”

पहा – www.hellomaharashtra.in

 

You might also like