प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करा- जिल्हाधिकरी दौलत देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोणत्या गोष्टिमुळे आपत्ती ओढवू शकते याचा विचार करून प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकरी दौलत देसाई यांनी आज दिल्या.जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व आपत्ती व्यवस्थापन समितीची छत्रपती शिवाजी सभागृहात बैठक आज झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने आदी उपस्थित होते.

सुरूवातीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी संगणकीय सादरीकरण करून प्रत्येक विभागाने सुट्टीच्या दिवशी आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्याबाबत सांगितले. जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, येणारी आपत्ती रोखण्यासाठी प्रत्येक विभागाची पूर्वतयारी हवी, त्यासाठी योग्य नियोजन हवे. प्रत्येक विभागाने स्वतंत्रपणे आपत्ती व्यवस्थापनचा आराखडा बनवावा. पूर्वतयारी, प्रतिसाद, खर्चाचे अंदाजपत्रक याचा समावेश यामध्ये असावा. हा आराखडा सर्वांना बंधनकारक असून लवकरात-लवकर बनवून तो सादर करावा, असेही ते म्हणाले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment