राज्य सरकारचा मोठा निर्णय; नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मिळणार 13,600 रुपयांची मदत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या वर्षीच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आणि आता याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यांना मदत करावी या उद्देशाने जिरायती पिकांच्या नुकसानासाठी सरकारकडून याआधी प्रती हेक्टर 8500 रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिले जात होते. परंतु आता ही मर्यादा वाढवलेली आहे. ती म्हणजे आता प्रति हेक्टर 13, 600 रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादित मर्यादित सरकारकडून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे.

याबाबत महाराष्ट्र सरकारने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती देखील दिलेली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे या पावसामध्ये नुकसान झालेले आहे. त्यांच्यासाठी सरकारकडून मदत होणार आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले आहे की, नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता भरीव मदत व्हावी या उद्देशाने जिराईत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर 13600 रुपये हे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असले तरी आता सरकारकडून मिळणारे या मदतीमुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाळ्यात भाताचे पीक घेतले जाते. परंतु भाताचे पीक लावल्यानंतर काही दिवसांनी अत्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला आणि त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आपत्तीग्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून मोठी मदत केली जाणार आहे.