‘एक वेळ हिजड्याला मुलं होतील’ असं म्हणणार्या नितिन गडकरींना दिशा शेख यांचं खूलं पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | भारतीय जनता पक्षाचे अनेक खासदार त्यांच्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेचा विषय ठरत असतात. उत्तर भारतातील काही भाजप नेत्यांनी नुकतेच हनुमान मुस्लिम होते असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर काहिंनी हनुमान चीनी होते असे म्हणुन वाद ओढवून घेतला होता. आता यात आणखी एका मोठ्या भाजप नेत्याची भर पडली असून देशाचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी “एक वेळ हिजड्याला मुलं होतील” असे वादग्रस्त विधान सांगली येथील शेतकरी मेळाव्यात केले.

“एक वेळ हिजड्याला मुलं होतील. मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं. मात्र भाजपा सरकारनं सिंचन योजना पूर्ण करुन दाखवली” असे गडकरी बोलण्याच्या ओघात म्हणाले. ‘टेंभू योजना अनेक वर्षांपासून अर्धवट होती. ही योजना कधी पूर्ण होईल, असं आम्हालादेखील वाटलं नव्हतं. खरंतर हे इथे बोलू नये. पण बोलतो. एकवेळ हिजड्याचं लग्न झालं तर त्याला मुलं होतील. पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही. मात्र भाजपा सरकारच्या काळात ही योजना पूर्ण झाली. शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. टेंभूसारख्या अनेक महत्त्वाच्या आणि महत्त्वाकांक्षी योजना भाजपा सरकारच्या कार्यकाळात पूर्णत्वास गेल्या,’ असे वक्तव्य नितिन गडकरींनी केल्याने त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे.

यापार्श्वभुमीवर कवयीत्री दिशा पिंकी शेख यांनी नितिन गडकरी यांना खूले पत्र लिहून त्यांनी केलेल्या विधानाचा जाहीर निषेध केला आहे. शेख यांनी लिहिलेले पत्र खालीलप्रमाण…

प्रति
आदरणीय, नितीन गडकरीसाहेब

विषय :- “हिजड्यानी लग्न केली तर त्यांना मुलं होतील पण जलसिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही” ह्या तुमच्या विधानाचा निषेध नोंदवणे बाबत…

महोदय,
जय भीम, जय भारत

सर्व प्रथम एक भारतीय नागरिक आणि मतदार म्हणून आपणास सांगू इच्छिते कि, आपण भारतात राहतो आणि ह्या देशाचं संविधान इथल्या प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने स्वतःच्या ओळखी सोबत जगण्याचा अधिकार देत, आणि हा सन्मान जर कुणी हिरावून घेत, एखाद्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा उपहास करत असेल तर तो त्या व्यक्तीचा किंवा त्या समूहाचा नाही, तर या देशाच्या संविधानाचा उपहास आणि अनादर आहे. आणि तुम्ही हा गुन्हा केलायत.

लोक प्रतिनिधी म्हणून सगळ्या समाजांचा आदर करणे आणि त्यांना सामाजिक सन्मान बहाल करणं हे तुमच कर्तव्य आहे. जात, वर्ग, लिंग भेदावर आधारलेल्या इथल्या पितृसत्ताक शोषणाच्या बळी पडलेल्या आपल्या समाज व्यवस्थेला या शोषणातून वर काढणं लोकप्रतिनिधींची जवाबदारी आहे. त्याच साठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे. हिजडा समाजाच्या अस्तित्वाचा, त्यांच्यात असलेल्या मातृत्वाचा असल्या घाणेरड्या पद्धतीने उपहास म्हणून वापरणे तुम्हाला शोभले नाही. एखाद्या शारीरिक मानसिक अपंगत्व असलेल्या, सामाजिक स्थरात मागासलेल्या समुदायाचा असा उपहास म्हणून वापर करण त्या समूहाचा अपमान आहे .

खरं तर ह्या अपमानाच्या विरोधात तुमच्यावर हिजडा समूहाने मानहाणीचा दावा करायला पाहिजे, पण ह्या देशात तुमच्या सारख्या नेतृत्वनमुळे स्वातंत्र्याच्या सत्तार पंच्याहत्तर वर्षानंतरही माझ्या समूहाच्या भुकेचे प्रश्न सुटलेले नाहीत. म्हणून माझ्या भगिनी तुमच्यासारख्यांकडून होणाऱ्या अपमानजनक वागणुकीलाही आपलं नशीब समजून भोगताना आणि जमाजीक अवहेलनेला सामोरे जातात… पण मी शिव, शाहू ,फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्र्रातील ‘हिजडा’ आहे. हो मी हिजडा आहे. त्यात अपमान वाटण्यासारखा काही नाही उलट हिजडा समाजाचा गौरवशाली इतिहास तुमच्यासारख्यानी इतिहासातून गायब केलाय, आणि त्याच इतिहासाची मी वारसदार आहे. म्हणून मी तुम्ही जो माझ्या हिजडा समूहाचा त्यांच्या लैगिकतेचा जो उपहास केला त्या कृत्याचा जाहीर निषेध करते,

#निषेध!#निषेध!#निषेध!

तुम्हाला निषेधाची माझी प्रमाण संवैधानिक भाषा समजेल अशी मी आशा बाळगते, आणि अनावधाने तुम्हाला किंवा तुमच्या समर्थक महानपुरुषी व्यक्ती कार्यकर्त्यांना माझं हे पत्र मिळालं तर त्यांनी ते तुम्हाला पोचवावं हि भोळी आशा बाळगते. हे पत्र तुम्हाला मिळाल्यावर तुम्ही माफी मागाल किंवा नाही हे तुमच्यावर झालेल्या संस्काराचे दर्शन असेल..
किमान परत कधी तुम्ही माझ्या आणि याचं भारताच्या समाजाचा भाग असलेल्या हिजडा समुदायाचा आदर कराल अशी भाबडी आशा बाळगते

धन्यवाद..

आपली मतदार या नात्याने मालक
दिशा पिंकी शेख

मु.पो:- श्रीरामपूर,
जिल्हा:- अहमदनगर,
ता:-श्रीरामपूर

ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

इंडिया टू पाकिस्तान वाया अफगानिस्तान, हामिद अंसारीची फिल्मी लव्हस्टोरी

उदयनराजेंकडून भाजप सरकारची स्तुती, राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ

इंदुरीकर महाराजां बद्दल च्या या गोष्टी तुम्हाला माहीती आहेत काय?

 

Leave a Comment