Disney Hotstar | डिज्नी हॉटस्टारवर लवकरच होणार बंद; नेमकं प्रकरण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Disney Hotstar | आजकाल अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उदयास आलेले आहेत. मोबाईलवर बसूनच अनेक लोक हे चित्रपट, मालिका बघत असतात. अनेक लोक हे मोबाईलवर क्रिकेटची मॅच देखील पाहतात. आणि क्रिकेटची मॅच ही मोबाईलवर डिज्नी हॉट स्टारवर (Disney Hotstar) त्यांना पाहता येते. देशातील कोट्यावधी लोक हे डिज्नी हॉटस्टार वरच लाईव्ह मॅचचा आनंद घेत असतात. परंतु आता क्रिकेट प्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे डिज्नी हॉटस्टार लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे आता लोकांना लाईव्ह मॅचचा आनंद घेता येणार नाही. परंतु हे नक्की असे का होणार आहे? लोकांना आता क्रिकेटची मॅच लाईव्ह पाहता येणार नाही का? याबद्दलचे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेले आहे. आता त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

अलीकडेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी डिज्नी हॉटस्टार खरेदी केलेले आहे. त्यामुळे आता डिज्नी हॉटस्टारचे (Disney Hotstar) सगळे अधिकार त्यांच्याकडे आलेले आहेत. आणि त्यांनी हा ओटीटी प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता ते डिज्नी हॉटस्टार बंद करून केवळ जिओ सिनेमा हे ओटीपी प्लॅटफॉर्म चालू ठेवणार आहे. म्हणजे त्याचा डिज्नी हॉटस्टार हे अंबानींच्या जिओ सिनेमामध्ये एकत्र होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीला दोन वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म चालवायचे नसल्याने कंपनीने हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हॉटस्टार जरी बंद झाले असले, तरी लोकांना जिओ सिनेमावर क्रिकेटची मॅच पाहता येणार आहे.

डिस्नी हॉटस्टार आणि जिओ सिनेमा होणार एकत्र | Disney Hotstar

एका वृत्तपत्रानुसार असे म्हटलेले आहे की, डिस्नी हॉटस्टार आणि जिओ सिनेमा हे एकत्र होण्याची योजना रिलायन्स इंडस्ट्रीकडून करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता जर तुम्ही डिस्नी हॉटस्टार हे स्वतंत्र डाउनलोड केले असले, तरी ते तुम्हाला चालवता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला जिओ सिनेमा घ्यावा लागणार आहे. गुगल प्ले स्टोअरच्या माहितीनुसार जवळपास डिस्नी हॉटस्टार हे 50 कोटी वेळा डाऊनलोड झालेले आहे. तर जिओ सिनेमा केवळ दहा कोटी डाऊनलोड आहे. त्यामुळे आता डिज्नी हॉटस्टार आणि जिओ सिनेमा एकत्रित करून पाहण्यासाठी लोकांना जिओ सिनेमा हा ॲप डाऊनलोड करावा लागणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीने त्यांच्या वार्षिक अहवालात असे देखील म्हटले आहे की, महिन्याच्या आधारावर 22.5 कोटी लोक हे जिओ सिनेमा डाउनलोड करतात, तर डिस्नी हॉटस्टार हे 33.3 कोटी युजर्स मासिक आधारावर डाऊनलोड करतात. त्या हे दोन्ही प्लॅटफॉर्म मार्च केल्याने कंपनीची मोठी बचत देखील होणार आहे. त्यामुळे आता जाहिरातींसाठी देखील युट्युबला या मोठी स्पर्धा लागलेली आहे. तसेच जिओ सिनेमाला आता नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमला देखील टक्कर देता येईल. अशी माहिती समोर आलेली आहे.