हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, लग्नात मुलीकडच्या लोकांनी जास्त सोने घातले नाही किंवा गाडी दिली नाही असे म्हणून वर पक्षाने लग्न तोडल्याचे आपण ऐकलं असेल. खरं तर ही पद्धत योग्य नाहीच आहे. परंतु मुलीकडच्या लोकांनी लग्न समारंभाच्या वेळी जेवणात मटणाची नळी दिली नाही म्हणून लग्न मोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येव्हडच नव्हे तर या मटणाच्या नळीवरून दोन्हीकडच्या व्हराडींमध्ये तुफान हाणामारी सुद्धा झाली. सदर प्रकार हा हैदराबाद येथे घडला आहे. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊया…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सदर लग्न हे वधू पक्षकाकडे निजामाबाद येथे होते. मुलीच्या कुटुंबीयांनी लग्नातील आलेल्या पाहुण्यांसाठी खास मटणाची व्यवस्था केली. सर्वकाही सुरळीत चाललं होते. परंतु अचानकच जेवणाच्या ताटात मटणाची नळीच नाही असं म्हणत मुलाकडील व्हराडी मंडळींनी दंगा करायला सुरुवात केली. सदर प्रकार वराकडील लोकांना समजताच पाणी याबाबत वाढू पक्षाकडे तक्रार केली. बोलता बोलता प्रकरण हाणामारीवर आलं आणि मग थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेले.
पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र काही निष्पन्न झाले नाही. मुलीच्या कुटुंबीयांनी जेवणात मटणाची नळी न देऊन आमचा अपमान केला अशी तक्रार मुलाच्या कुटुंबीयांनी केली तर दुसरीकडे लग्नाच्या जेवणासाठी नल्ली मटणाची कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे त्याची व्यवस्था झाली नाही अशी बाजू मुलीच्या कुटुंबीयांनी मांडली. पोलिसांनी खूप समजावून सुद्धा मुलाच्या घरच्यांनी अखेर हे लग्नच मोडून टाकलं आणि माघारी घरी परतले. परंतु शुल्लक अशा मटणाच्या नळी वरून लग्न मोडल्याने सदर घटनेची चर्चा संपूर्ण देशात सुरु आहे. या प्रकरणाच्या रूपाने समाजात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.