औरंगाबाद | विभागीय कृषी कार्यालयाकडून शेतक-यांचे थकीत असलेल्या शेततळ्याचे 3 कोटी 30 लाखअनुदान वितरित करण्यात आली, असल्याची माहिती कृषी खात्याने दिली आहे.
कृषी विभागाकडून शेततळ्यासाठी जिल्ह्यात 3 कोटी 30 लाख रुपये अनुदान शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचे भरीव काम केले आहे. त्यामुळे ओलिताचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतून शेततळ्याची कामे केली जातात. वर्षभरात आतापर्यंत 469 शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
त्यासाठी साडेसहा कोटीची गरज होती. परंतु शासनाकडून साडेतीन कोटी रुपये मिळाले आहेत. आलेला निधी शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. याचा शेतक-यांना निश्चितच लाभ होणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou