कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्याचे सहकार, पणन व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दख्खनचा राजा ‘श्री क्षेत्र जोतिबा डोंगर’ वाडी रत्नागिरी येथील गरजूंना धान्य, मास्क, व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. गेली दोन वर्ष झाली कोरोनाच संकट प्रत्येकावर आहे. कोरोनाला अळा घालण्यासाठी जो लाॅकडाऊन करण्यात आला, त्यामुळे सर्वांचे अर्थचक्र बिघडले आहे. मोठ्या उद्योगांना, व्यापारी वर्गाला तर फटका बसलाच पण सर्वात जास्त नुकसान व हाल हे हातावरचे पोट असणाऱ्या सामान्य नागरिकांचे झाले आहे. त्यात देवस्थानं ही कोविड च्या नियमावली मुळे पूर्ण बंद आहेत.
अखंड महाराष्ट्राच कुलदैवत श्री क्षेत्र जोतिबा (श्री केदारनाथ) वाडी रत्नागिरी या देवस्थानाला दर्शनासाठी अनेक राज्यातून भाविक येतात. या देवस्थानाच्या भोवती अनेक स्थानिक लोक, ग्रामस्थ वास्तव्यास आहेत. यातील प्रामुख्याने लोकांचा उदरनिर्वाह हा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर आहे. दोन वर्षी यात्रा, खेटे झाली नाही मंदिर बंद असल्यामुळे भाविक दर्शनास येऊ शकत नाहीत.
आता दुसर संकट डोक्यावर आल ते म्हणजे अतिवृष्टी मुळे नद्यांना आलेले पूर व कोसळलेल्या दरडी यामुळे ठीकठिकाणी नुकसान झाले आहे. या सर्वांचा परिणाम हा जास्त करुन देवस्थानच्या निगडीत व्यवसायाला व लोकांना पडला या सर्व गोष्टी लक्षात घेऊन “श्री. क्षेत्र जोतिबा डोंगरावरील गरजूंना सातारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तू, धान्य, व मास्क चे वाटप निखिल दादा शिंदे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.
त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कराड द.अध्यक्ष सागर देसाई, श्री क्षेत्र जोतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक- महादेव दिंडे, मानसिंग यादव, रोहीत कांबळे, सागर इंगोले, करण यादव, विक्रम नलवडे, भरत पाटिल, गणेश मिटले, देवराज बनकर, भैरव लादे, अथर्व साळुंखे, महेश गायकवाड, विक्रम सातपुते, अमित ताटे, स्वप्नील जाधव आदी उपस्थित होते.