फलटण | फलटण तालुक्यातील तरडफ येथील माजी सरपंच व विघमान ग्रामपंचायत सदस्य रविद्र पिसाळ यांनी कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गावातील लोकांच्या आरोग्यासाठी सॅनिटायझर बॉटल व एन 95 मास्क वाटप केले आहे. गावातील सर्व ग्रामस्थांना मोफत वाटप व्हावे यासाठी ग्रामपंचायतीकडे सर्व साहित्य सुपूर्द केले आहे.
यावेळी ग्रामसेविका काशिद मॅडम, विलास कदम, बाबूराव राजपुरे, हणमंत पिसाळ, मोहन मदने, दादा ढवळे, दादा मोरे, शिवाजी सोळसकर, गणेश सोळसकर, रोहित गोडसे, राहूल राऊत, गणेश कुंभार सतीश ढेंबरे, कालीदास गोडसे, हणमंत गोडसे,नवाज मुलाणी, शब्बीर मुलाणी, प्रशांत माने अराविद गोडसे,आदी उपस्थित होते.
रविंद्र पिसाळ म्हणाले, प्रत्येकाने आता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना महामारीत अनेक जवळच्या लोकांना त्रास झाला आहे. गावातील लोकांना सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करताना आनंद होत आहे. ग्रामस्थांना विनंती आहे, सर्वांनी आरोग्य विभागाला सहकार्य करून सूचनाचे पालन करावे.