कराडात लोकशाही आघाडीच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराडमधील रेव्हीन्यू कॉलनीतील विक्रमसिंह देशमुख आणि देशमुख परिवाराच्या वतीने ग्रामीणमधील बारा डबरे येथील अंगणवाडी क्र. 118 तील 20 मुलं आणि 18 मुली अशा एकूण 38 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. कराड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील आणि लोकशाही आघाडीच्या मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला कराड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, आदरणीय पी. डी. पाटील सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक मोहसीन आंबेकरी, भाऊसाहेब पवार, राकेश शहा, भाऊसाहेब शिंदे, आख्तर आंबेकरी, विठ्ठलराव देशमुख, जयंत बेडेकर, मुदस्सर आंबेकरी, निवास पवार, सागर माने, प्रशांत भोसले, रमेश पाटील, अमोल पवार, पत्रकार शुभम मोरे, अमोल टकले, सुहास कांबळे, अभयकुमार देशमुख, सागर पाटसुपे, अंगणवाडी शिक्षिका वंदना पाटसुपे, मीना काटवटे, कोमल लगाडे, सुरेखा जाधव, सारीका देशमुख, मनीषा पवार, कोमल भिसे, सना मुल्ला, फातीमा मुल्ला, फातीमा मुल्ला, राजश्री येळवार, सावित्री कोळी, कोमल खिल्लारे, ख्वाजाबी रमाजान आदी पालक आणि परिसरातील रहिवाशांची उपस्थिती होती.

साैरभ पाटील म्हणाले, पुढील पिढीला शैक्षणिक सुसज्जता मिळणे गरजेचे आहे. देशमुख परिवाराने राबविलेल्या या शैक्षणिक सामाजिक उपक्रमांचे काैतुक करणे गरजेचे आहे. समजात अशा परिवारामुळे भावी पिढीचे भविष्य उज्वल होण्यास मदत होई. यावेळी माजी नगरसेवक आख्तर आंबेकरी आणि बाळासाहेब पवार यांनी देशमुख मित्र परिवाराने गरजू विद्यार्थ्याना शालेय गणवेश वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे सांगत या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.