जिल्हाबंदी ः सातारा, सांगली जिल्हा हद्दीची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पोलिस कर्मचारी फिल्डवर काम करत आहेत. चेकनाका, पेट्रोलिंगचे काम करत असताना पोलिस बाधित झालेे आहेत. पोलिस जनतेसाठी आहेत, तेव्हा तुम्हीही पोलिसांना सहकार्य करावे. पोलिस दल सज्ज आहे. पोलिस समजून सांगत आहेत तरी जाणीवपूर्वक गर्दी केली, ऐकले नाही तर त्यांच्यावर नाईलाजास्तव कठोर कारवाई करण्यात येईल असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावरील सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या हद्दीत जिल्हा बंदीच्या अनुषंगाने केलेल्या नाकाबंदीची पाहणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी करून पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी पोलिस उपअधिक्षक डाॅ. रणजित पाटील, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पीएसआय अशोक भापकर यांच्यासह सांगली जिह्यातील पोलिस अधिकारी उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, काल रात्रीपासून जिल्हाबंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारण असेल व तशी परवानगी असणे गरजेचे आहे. सातारा, सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर पुरेसा बंदोबस्त आहे. प्रत्येक पोलिस दलात होमगार्डचा जादा स्टाफ दिलेला आहे. रोटेशन पध्दतीने कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात येणार आहे. नागरिकांनीही गरज नसताना बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये. पोलीस लाॅकडाऊनसह जिल्हा नाकाबंदीचे काम चोख करत आहेत. विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र लोक ऐकत नसतील तर कडक कारवाई ची अंमलबजावणी करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment