सातारा । सातारा जिल्ह्यात 15 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नवा आदेश काढला आहे यामध्ये सर्व दुकाने, हॉटेल व शॉपिंग मॉल हे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील धार्मिक स्थळे/ मंदिरे बंद ठेवण्यात येणार आहेत. सिनेमागृहे बंद राहतील. हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी रात्री नऊ वाजेपर्यंत बसून जेवणास परवानगी असेल तर 24 तास पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. खेळ व क्रीडांगणे व्यायामासाठी वेळेच्या मर्यादेत सुरू ठेवण्यात येतील.
लग्नसोहळ्यासाठी कार्यालयाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 100 लोकांची परवानगी असणार आहे. लग्नसोहळ्यासाठी परवानगी बंधनकारक राहणार आहे. तर खुल्या जागेत लग्नकार्य घेतल्यास किंवा लॉन मध्ये जागेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांची परवानगी असणार आहे.