जिल्हा अनलाॅक? : सातारा जिल्ह्यात नवे 872 पाॅझिटीव्ह तर 1 हजार 341 कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडकेे 

सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 872 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 341 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 11 हजार 761 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 7. 41 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 10 हजार 426 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 7 हजार 764 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 94 हजार 189 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी दिवसभरात 17 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

जिल्हा अनलाॅक होणार का?

सातारा जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात पाॅझिटीव्हीटी रेट 10 टक्यांपेक्षा कमी झालेला आहे. यात केवळ कराड तालुका सर्वात जास्त आहे. अन्यथा जिल्ह्यातील दहा तालुक्यात बाधितांचे प्रमाण अत्यंत घटलेले आहे. तेव्हा आज प्रशासन जिल्ह्याच्या अनलाॅक संदर्भात निर्णय घेणार का याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

Leave a Comment