हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या बाजारात (Dlite RX-100) इलेक्ट्रिक वाहनांची चलती आहे. एक से बढकर एक इलेक्ट्रिक वाहनं आता मार्केटमध्ये येतायत. त्याच पार्श्वभूमीवर आता नवीन स्टार्टअप इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनी Dlite ने भारतात नवीन आधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर RX-100 सादर केली आहे. वेगळ्या आणि हटके अंदाजातील या स्कुटरचा लुक खूपच आकर्षक आहे.
ही इलेक्ट्रिक स्कूटर (Dlite RX-100) स्पोर्टी हेडलाइट सेटअप, स्टायलिस्ट लुकिंग LED DRLs, विविध प्रकारचे टर्न इंडिकेटर लाइट, युनिक डिझाइनसह आधुनिक भिन्न डिझाइन आकाराच्या बॉडी, टेललाइट सेटअप, स्टँडर्ड लुकिंग रियर व्ह्यू मिरर आणि लक्षवेधी आकर्षक रंगांचे पर्याय अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. या इलेक्ट्रिक बाईकचे वजन ७५ किलोग्रॅम आहे. आणि ही गाडी १७० किलोग्रॅम लोड सहन करू शकते. गाडीची रुंदी ७०० मिमी लांबी १८०० मिमी उंची १२८० मिमी आहे.
70 किमी रेंज- (Dlite RX-100)
RX 100 लीड-ऍसिड किंवा लिथियम-आयन बॅटरी पॅकमध्ये येते . RX 100 ही कमी गतीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी 25 किमी (Dlite RX-100) प्रतितास वेगाने धावू शकते. ही इलेक्ट्रिक स्कुटर एकदा चार्ज केल्यांनतर ७० ते ८० किलोमीटर चालेल. चार्जिंग टाइम हा ५ ते ६ तास आहे. गाडीच्या मागील ड्रम सेटअप मधेच बॅटरी बसवण्यात आली आहे. Dlite RX-100 पूर्णपणे डिजिटल एलईडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अॅडव्हान्स मल्टी फंक्शनल एलईडी डिजिटल डिस्प्ले सिस्टीम, लांब किंवा आरामदायी सीट, दोन्ही बाजूला आधुनिक अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर्ससह येते.