चेन्नई : वृत्तसंस्था – तमिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी बुधवारी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेऊन त्यांनी पक्षस्थापनेचा दावा केला होता. मंगळवारी द्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी एम. के. स्टॅलिन यांची निवड करण्यात आली होती.
Chennai: DMK Chief MK Stalin takes oath as the Chief Minister of Tamil Nadu.
He is being administered the oath by Governor Banwarilal Purohit pic.twitter.com/e8IZT1aNFz
— ANI (@ANI) May 7, 2021
राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी एम. के. स्टॅलिन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा शपथविधी अत्यंत साध्या पद्दतीने करण्यात आला. एम. के. स्टॅलिन यांनी द्रमुकच्या १३३ आमदारांची यादी आणि पक्षनेतेपदी त्यांची एकमताने निवड केल्याचे पत्र राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना सादर करून त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
यानंतर राज्यपालांनी त्यांना नवे सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले. नव्या सरकारच्या स्वागतासाठी फोर्ट सेंट जॉर्ज येथील सचिवालय तयार करण्यात येत आहे. अण्णा द्रमुकच्या मावळत्या मंत्र्यांनी आपापली दालने रिकामी केली आहेत. तिकडे आता रंगरंगोटी आणि नव्या मंत्र्यांच्या नावांच्या पाट्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.