सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
”फोडा, झोडाचे राजकारण करणाऱ्यांशी शिवरायांशी तुलना होवू शकत नाही”असा टोला अभिजीत बिचुकले यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाला राज्यभरातून विरोध दर्शवला जात आहे. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शिवछत्रपती असे व्यक्तिमत्व आहे, ते कोणत्याही धर्माचे, जातीचे नाही. शिवरायांनी सर्व जाती- धर्माच्या लोकांनी एकत्र घेवून स्वराज्य निर्माण केले. अशा परिस्थितीत ज्यांनी फोडा आणि झोडाचे राजकारण करतात अशांची तुलना शिवरायांशी कशी काय होवू शकते. हा निर्लज्जपणा असून ज्यांनी शिवरायांच्या नावावर आयुष्यभर पीठ मागितले आणि स्वताःची पोट भरले. त्यांना माहिती नाही, आपली युती कोणाबरोबर करायची? कसे वागायचे ? कसे बोलायचे तेव्हा तुमच्यात छत्रपतीचा एकतरी गुण आहे का ? असा प्रश्न साताराचे कवी अभिजीत बिचुकले यांनी केला आहे.
गिरो गिरो उस झरने की तरहा !!
जो उतनी ऊचांयिसे गिरके भी आपनी सुंदरता खोने नही देता !!
आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी शिवरायांचा नावाचा वापर करू नका. मग तुम्ही कुणीही असा. माझ्याकडे शिवछत्रपतीची तत्वे आहेत. पूर्ण निर्व्यसनी आहे. मी सर्व समाजाला घेवून चालतो, मी अन्याय सहन करत नाही. मी अन्याय झाला तर राजाला जावून नडतो. तेव्हा तुम्ही एकमेंकावर अन्याय करता, गोरगरिंबाना छळता. तुम्हांला सत्ता पाहिजे असली की नको त्या लोकांशी हातमिळवणी करताय. तेव्हा शिवरायांचे नांव घेवू नका, त्यांच्या तत्वांशी एकनिष्ठ रहा. असं मातही बिचुकले यांनी व्यक्त केलं आहे.