हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PM Kisan योजनेअंतर्गत 12व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जर शेतकऱ्यांना हा हप्ता हवा असेल तर त्यांना या योजनेअंतर्गत केवायसी करावे लागेल. हे लक्षात घ्या कि, या योजनेअंतर्गत केवायसी पूर्ण करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. जर उद्यापर्यंत केवायसी केले गेले नाही तरया योजनेचे पैसेही मिळणार नाहीत.
केंद्र सरकारकडून फेब्रुवारी 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 3 हप्त्यांमध्ये 2-2 हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेचे 11 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तसेच येत्या काही दिवसात 2000 रुपयांचा पुढील हप्ताही दिला जाणार आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार 11.20 कोटी लाभार्थ्यांची या योजनेमध्ये नोंदणी देखील झाली आहे.
आता ‘या’ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही
सुरुवातीला PM Kisan ही योजना फक्त 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी होती. मात्र यानंतर फक्त स्वतःची जमीन असणाऱ्या शेतकर्यांनासाठीच ती लागू करण्यात आली. मात्र या योजनेचा लाभ प्रत्येक जमीनधारक शेतकऱ्याला मिळेलच असे नाही. यासाठी सरकारकडून काही अटी देखील ठेवण्यात आलेल्या आहेत. चला तर मग या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही ते जाणून घेऊयात …
ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची शेतजमीन नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.
आजोबा किंवा वडिलांच्या नावावर किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर शेतजमीन असेल तरी देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.
जर जमीनीचा मालक सरकारी नोकरीत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.
तसेच रजिस्टर्ड डॉक्टर, इंजिनीअर, वकील, सीए यांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे.
जर एखाद्याला वार्षिक 10,000 रुपये पेन्शन मिळत असेल तर तो देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही.
एखाद्या शेतकरी कुटुंबातील कोणताही सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. इथे कुटुंबातील सदस्य म्हणजे पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले असतील. PM Kisan
अशा प्रकारे पूर्ण करा e-KYC
PM Kisan साठी इच्छुक आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑनलाइन देखील केवायसी करता येईल. हे 2 प्रकारे केले जाऊ शकते. शेतकऱ्यांना घर बसल्या स्मार्टफोनवरून OTP आधारित KYC करता येईल किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर (CSC) जाऊन बायोमेट्रिक केवायसी करता येईल. OTP द्वारे केवायसी प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही तर कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे केवायसी करण्यासाठी काही शुल्क द्यावे लागेल.
स्मार्टफोनवरून e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असला पाहिजे. कारण OTP हा फक्त रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरच येईल, ज्याद्वारे e-KYC ची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. PM Kisan
अशा प्रकारे पूर्ण करा e-KYC
पीएम किसान वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या.
त्यानंतर ‘फार्मर्स कॉर्नर’ वर जा आणि e-KYC वर क्लिक करा.
एक नवीन पेज उघडेल. येथे आधार क्रमांक टाका आणि सर्च टॅबवर क्लिक करा.
शेतकऱ्याच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर OTP येईल.
OTP टाका आणि सबमिट वर क्लिक करा.
यानंतर, e-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज मिळेल.
हे पण वाचा :
बँकेची overdraft facility काय आहे ??? त्याचा फायदा कसा घ्यावा हे समजून घ्या !!!
Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीच्या शेअर्सने गुतंवणूकदारांना केले मालामाल !!!
SBI देत आहे 6,000 रुपये जिंकण्याची संधी !!! या मेसेजमागील सत्य जाणून घ्या
शॉर्ट टर्म Corporate FD मध्ये गुंतवणूक करून मिळवा चांगले रिटर्न !!!
Post Office च्या ‘या’ योजनेद्वारे इतक्या महिन्यात मिळवा दुप्पट पैसे !!!