हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दहावी आणि बारावी झाली की, भविष्यात जाऊन करियर नक्की कशात करायचे? याबद्दल अनेक विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला असतो. एखादी नोकरी केल्यानंतर पुढे जाऊन त्या फिल्डमध्ये किती स्कोप आहे?तसेच आपल्याला चांगली नोकरी मिळेल का? चांगला पगार मिळेल का? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा काही कोर्स बद्दल माहिती सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही चांगले शिक्षण घेऊ शकता. आणि तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी देखील मिळेल.
अनेक वेळा आपण पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतो. परंतु एवढे शिक्षणातूनही आपल्याला चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळत. नाही मिळाली तरी तुम्हाला चांगला पगार मिळत नाही. अशावेळी तुम्ही काही चांगले कोर्स करणे गरजेचे आहे. ज्यातून तुम्हाला चांगला पगार देखील मिळेल. आणि चांगल्या ठिकाणी तुम्ही नोकरी करू शकता. आता आपण जाणून घेऊयात कोणते कोर्सेस केले पाहिजे.
एमबीए
अनेक लोक हे पोस्ट ग्रॅज्युएशन करतात अनेक लोकांची पहिली पसंती ही एमबीए असते. एमबीए म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन डिग्री घेऊन तुम्ही तुमचे नेतृत्व कौशल्य धोरणात्मक विचार आणि आर्थिक व्यवस्थापन चांगली करू शकता. जर तुमच्याकडे एमबीएची डिग्री असेल तर तुम्हाला चांगल्या पॅकेजसह नोकरी मिळेल.
एमएससीएस
कम्प्युटर सायन्स ऑफ मास्टर ऑफ सायन्सचा अभ्यास करून तुमचे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांचे चांगले ज्ञान वाढेल. तसेच तुम्हाला ऍडव्हान्स आयटी स्किल शिकायला मिळेल. अभ्यासक्रम केल्यानंतर तुम्हाला लाखो रुपयांचे पॅकेज देखील मिळेल.
एमएसई
तुम्हाला जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे असेल तर एमएसई हा पर्याय तुमच्यासाठी चांगला असू शकतो. इंजीनियरिंग मधील मास्टर ऑफ सायन्स मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिविल आणि केमिकल इंजीनियरिंग यामध्ये असते. तुम्ही या क्षेत्रात देखील पदवी घेऊन टेक्निकल क्षेत्रात चांगला जॉब मिळू शकता. तसेच त्यातून तुम्हाला चांगला पगार देखील मिळेल.
याशिवाय अशा अनेक फिल्ड आहे. ज्यामध्ये तुम्ही शिक्षण घेऊन मासिक लाखोंची कमाई करू शकता. यामध्ये तुम्ही फायनस मध्ये मास्टर ऑफ सायन्स करू शकता. तसेच मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ, मास्टर ऑफ सायकॉलॉजी, मास्टर ऑफ फाईन आर्ट, मास्टर ऑफ सायन्स इन नर्सिंग यांसारखे अनेक कोर्सेस करून तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकता. जर तुम्ही देखील उच्च शिक्षणासाठी नवनवीन पर्याय शोधत असाल, तर या पर्यायांचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.