शेतकऱ्यांनो सावधान ! ३१ मार्चपूर्वी करा ‘या’ गोष्टी

kisan credit card
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शेकऱ्यांसाठी आता पुढचे चार दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. कारण त्यांना ३१ मार्चपर्यंत दोन महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. त्या गोष्टी म्हणजे एक किसान क्रेडिट कार्डचे पैसे जमा करण्याची ही शेवटची तारीख आहे. आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (पंतप्रधान-किसन) लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत आधार लिंक करावे लागणार आहे. ही दोन्ही कामे केली नाहीत तर आर्थिक नुकसान त्यांना सहन करावे लागणार आहे.

आता केसीसीवर बँकेतून घेतलेल्या ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज परत करण्यास अवघ्या चार दिवसांचा कालावधी शिल्लक राहिले आहेत. ३१ मार्चपर्यंत शेतकर्‍यांना मूळ रक्कम ही ४ टक्के व्याजासह पैसे जमा करावे लागतील. वेळेत पैसे परत केल्यामुळे बँकेत आपली विश्वासार्हता टिकून राहिल. अन्यथा ७ टक्के दराने व्याज आकारले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच आपले पिसे भरून होणार आर्थिक तोटा टाळणे महत्वाचे आहे. म्हणून शेतकऱ्यांनो आजच या दोन गोष्टी कराव्यात आणि पुढे निश्चित राहावे.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेतलयास शेतकऱ्यांना नानक फायदे होतात. त्यामध्ये

१. पैशाच्‍या वाटपाच्‍या पध्‍दती सोप्‍या करते.

२. नगद आणि स्‍वरूपासंबंधी कठिणपणा काढून टाकते.

३. प्रत्‍येक पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्‍याची गरज नाही.

४. शेतकरयासाठी व्‍याजाचा भार कमी करणे शक्‍य करीत कोणत्‍या ही वेळी खात्रीलायकपणे कर्ज मिळण्‍याची हमी.

५. शेतकरयाच्‍या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्‍यास मदत करते.

६. डीलर्स कडून कॅश अव्‍हेल डिस्‍काउंट (नगद लाभ सूट) वर खरेदी करण्‍यास मदत करते.

७. वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा – हंगामी मूल्‍यांकनाची गरज नाही.

८. जास्‍तीत जास्‍त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्‍या उत्‍पन्नावर आधारित.

९. किती वेळा पैसे काढू शकता ती संख्‍या कर्ज सीमेवर अवलंबून.

१०. परतफेड फक्‍त हंगामा नंतर शेतीसाठी घेतलेल्‍या आगावू रकमेवर व्‍याज दर लागू असल्‍याप्रमाणे जामीन.

११. मार्जिन व दस्‍तऐवजांचे मानक शेतीसाठी घेतलेल्‍या आगावू रकमेवर लागू असल्‍याप्रमाणे, आदी गोष्टी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहेतणार आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group