हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या नव्या युगात बदललेल जीवनमान, जेवणाची अनियमित वेळ, जागरण, अपुरा व्यायाम यामुळे अपचन होऊन आपल्याला पित्ताचा त्रास उद्भवतो. वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. आज आपण जाणून घेऊया पित्तावरील काही घरगुती उपायांबद्दल..
पित्त होण्याची लक्षणे-
भूक वाढणे
केस पांढरे होणे
निद्रानाश
श्वास किंवा शरीराची दुर्गंधी
मळमळ वाटणे
घशाला सतत कोरड पडणे
पित्तामुळे कोणकोणते आजार होऊ शकतात-
छातीत जळजळ
सांधेदुखी
ताप
थकवा
अंधदृष्टी
त्वचेचे रोग
पित्तावर घरगुती उपाय –
सकाळी २ ग्लास कोमट पाणी पिल्याने पित्त कमी होण्यास मदत होते.
आल्याचा छोटा तुकडा चघळल्याने पित्तापासून सुटका मिळू शकते. पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या.
बडिशेपही पित्तावर गुणकारी आहे. बडीशेप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते तसेच बद्धकोष्ठता दूर होते. बडिशेपचे दाणे चघळल्याने पित्ताचा त्रास कमी होतो.
नियमितपणे तुळशीची पाने खाल्ल्या मुळेही पित्ताचा त्रास कमी होऊ शकतो.
जेवल्यानंतर लवंग चघळल्यामुळे पित्तापासून तुमची सुटका होवू शकते.
जिऱ्याचे दाणे चघळल्यानेही पित्ताची समस्या दूर होण्यास मदत होते. जिऱ्याच्या सेवनामुळे पचन सुधारते , मेटाबॉलीझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात .