हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संपूर्ण देशभरात ख्रिसमस सणाची जोरदार तयारी सुरू आहे. सध्या ख्रिसमससाठी बाजारात अनेक सुंदर सुंदर ख्रिसमस ट्री विकण्यासाठी आले आहेत. कारण ख्रिसमस ट्री शिवाय ख्रिसमस हा सण अपूर्ण असतो. ट्री मुळेच ख्रिसमस सणाला आणखी शोभा येते. ख्रिसमस ट्री घरात लावल्यानंतर तसेच त्याला सुंदर सजवल्यानंतर घराची आणखीन शोभा वाढते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की हे ख्रिसमस ट्री का लावले जातात? तसेच यामागे नेमका इतिहास काय आहे? नसेल माहित तर चला जाणून घेऊयात.
Balsam fir म्हणजे ख्रिसमस ट्री
ख्रिसमस ट्रीलाच Balsam fir असे म्हणले जाते. हे झाड कोणत्याही ऋतूमध्ये सुकत नाही किंवा त्याचा हिरवा रंग जात नाही. थोडक्यात वर्षभर हे झाड बहरत असते. या ट्रीविषयी पाश्चात्य संस्कृतीमध्ये अनेक वेगवेगळ्या मान्यता आहेत. त्यामुळे आज देखील ख्रिसमस सणादिवशी हा ट्री सजवला जातो. या झाडाप्रमाणेच प्रत्येक एक मनुष्य कायम भरत राहो अशी त्यामागे मान्यता असते.
ख्रिसमस ट्री इतिहास
ख्रिसमस ट्री सजवण्याची खरी परंपरा जर्मनीमध्ये सुरू झाली. 1700 काळामध्ये सर्वत्र ही परंपरा स्वीकारली गेली. प्रोटेस्टंट रिफॉर्मेशनचा नेता मार्टिन ल्यूथर यांनी आपल्या घराच्या आत सुंदर असे तारेमय आकाश निर्माण करण्यासाठी झाडावर जळत्या ठेवल्या होत्या. त्यामुळे हे झाड एवढे सुंदर दिसत होते की त्याने घराची शोभा वाढवली. तिथून पुढे सर्वांनीच हे झाड घरात लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर इंग्लंडमध्ये ख्रिसमस ट्री परंपरा 1840 मध्ये सुरू झाली. या परंपरेचे श्रेय राणी व्हिक्टोरियाचे पती प्रिन्स अल्बर्ट यांना जाते. बघता बघता ही परंपरा मध्यमवर्गीय घरांमध्ये देखील सुरू झाली.