बाप रे ! डॉक्टरांनी चक्क Youtube वर बघून केले ऑपरेशन; 15 वर्षीय मुलाने गमावला जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या प्रत्येकासाठी डॉक्टर हा देवाचे दुसरे रूप असतो. जेव्हा कोणतेही पेशंट हे बेडवर असते. तेव्हा सगळ्यांच्या नजरा फक्त डॉक्टरांकडे असतात. परंतु सध्या डॉक्टरांकडून इतक्या बेजबाबदार प्रकारच्या घटना घडत आहेत की, लोकांचा डॉक्टर वरचा विश्वास देखील हळूहळू आता उडताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना बिहारमध्ये घडलेली आहे. बिहारमध्ये एका डॉक्टरने चक्क युट्युबवर बघून एका 15 वर्षाच्या मुलाचे ऑपरेशन केले आहे. या मुलाचे पोट सारखे दुखत होते. तसेच त्याला उलट्या देखील होत होत्या. त्यानंतर त्या डॉक्टरांनी मुलाचे youtube वर बघून ऑपरेशन केले. ऑपरेशन नंतर त्या मुलाची परिस्थिती सुधारण्या ऐवजी आणखीनच बिघडली आणि दुर्दैवाने त्या मुलाचा मृत्यू देखील झालेला आहे.

त्याचप्रकारे या डॉक्टरने त्या मुलाच्या कुटुंबीयांची परवानगी न घेता त्याचे ऑपरेशन केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आलेली आहे. मौढर ठाणे क्षेत्रातील धर्मबाळगी येथील गणपती सेवासदंच्या नर्सिंग हॉस्पिटलमध्ये ही घटना घडलेली आहे. सध्या मृत्यू झालेल्या मुलाच्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरलेली आहे. आणि अत्यंत संतप्त आणि आक्रमक असे वातावरण तयार झालेले आहे. त्या डॉक्टरांनी केलेले ऑपरेशन अयशस्वी झाल्याने मुलाला त्याचे प्राण गमवावे लागलेले आहे. तसेच ते डॉक्टर आणि त्याच्यासोबत असणारे साथीदार देखील फरार झाले होते. परंतु त्या मृत मुलाच्या कुटुंबीयाने त्याची त्या डॉक्टरांची तक्रार केली. आणि अखेर पोलिसांनी त्या डॉक्टरांना त्याच्या साथीदारांना पकडून अटक देखील केली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार मृत झालेल्या मुलाचे नाव गोलू असे होते. आणि तो 15 वर्षाचा होता. तो भूवालपुर या गावचा रहिवासी होता. त्या मुलाचे सातत्याने पोट दुखत होते आणि उलट्याही होत होत्या. त्याचे वडील चंदन हे त्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले होते. परंतु त्यावेळी त्या मुलाला उपचारासाठी डॉक्टरांनी दाखल केले. हे हॉस्पिटल चालवणारे डॉक्टर अजित कुमार पुरी यांनी कुटुंबीयांना न सांगताच गोलूचे ऑपरेशन केले, असा आरोप देखील त्यांच्यावर लावण्यात आलेला आहे. ऑपरेशन झाल्यानंतर त्या मुलाची तब्येत जास्तच घालवली त्याचा मृत्यू झाला.

त्या डॉक्टरांनी मोबाईलवर youtube वर पाहून गोलूची शस्त्रक्रिया केल्याचा आरोप कुटुंबीयांनी लावलेला आहे. तसेच गोलूवर शस्त्रक्रिया सुरू करत असताना डॉक्टरांनी गोलूच्या वडिलांना कंपाउंडरसोबत डिझेल आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी रुग्णालयात फक्त गोलूचे आजोबा आणि आजी तिथे उपस्थित होते.

ऑपरेशन दरम्यान गोलूची तब्येत जास्त बिघडली. त्यानंतर त्या डॉक्टरांनी स्वतः त्या रुग्णाला आणि आजीला रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात नेलं. परंतु त्या रुग्णालयात जाण्या आधीच त्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाचा जीव गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी मृतदेह तिथेच सोडला आणि बॅग घेऊन फरार झाला. त्यानंतर त्या मुलाचे आजी त्याचा मृतदेह घेऊन कशीबशी परतली. सध्या हे प्रकरण खूप हिंसक असे वळण घेत आहे. परंतु त्या डॉक्टरला त्याच्या साथीदारांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेले आहे.