सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
डाॅक्टर नोकरीला सरकारी रूग्णालयात, कमाई सरकारी अन् सेवा खासगी दवाखान्यात अशी परिस्थिती सातारा जिल्हा रूग्णालयात असल्याचे समोर आले आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क डाॅक्टराला दमबाजीच केली. यामुळे सरकारी दवाखान्यात आलेल्या गरीब, गरजू रूग्णांना खासगी दवाखान्यात पाठवून लुबाडणूक करत असल्याचे समोर आहे. तेव्हा आता डाॅ. मानेवर कारवाई होणे गरजेचे असून अशा डाॅक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याची गरज आहे. या प्रकारामुळे सरकारची फसवणूक होत असून गरीबांच्या जीवाशी खेळ केला जात आहे.
जावली तालुक्यातील बामणोली गावचे शुभम तरडे हे त्यांच्या पत्नीच्या पोटात खूप दुखत असल्याने उपचारासाठी सातारा येथील सह्याद्री हॉस्पिटलला घेऊन गेले होते. यावेळी जिल्हा रूग्णालयातील डाॅ. माने यांनी त्यांना सह्याद्री हाॅस्पिटलात तापसले. त्यावर सदर रुग्णाच्या किडणीला सुझ असून किमान 4 दिवस दवाखान्यात दाखल करावे लागेल, असे सांगण्यात आले. सदर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्या कारणाने त्यांनी दवाखान्यात भरती न होता, घरी जाण्याचा निर्णय घेतला. तसे त्यांनी संबंधित डाॅ. माने यांना सांगितलं. परंतु तरी माने यांनी त्यांना भरती करण्यावर जोर दिला, शेवटी आर्थिक गणित जुळत नसल्याने तरडे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते याना संपर्क केला. श्री. मोहिते यांनी त्यांना सातारा जिल्हा रूग्णालयात भरती करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तरडे यांनी त्यांच्या पत्नीला जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर सकाळी डाॅक्टर तपासातील असे सांगितले गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर तपासायला आले, ते म्हणजे सह्याद्री हॉस्पिटल मधील डाॅ. माने हेच होते. सदर रुग्णाला येथे भरती झाल्याचे पाहून डॉक्टर साहेबांचा पारा चडला. डाॅक्टरांनी कसलीही तपासणी न करता त्वरित संबंधित परिचारिका यांना सौ. तरडे या रुग्णाला घरी सोडण्याचा आदेश दिला. स्वतः नोकरी करीत असलेल्या खाजगी दवाखान्यात सांगून देखील भरती न केल्याचा राग मनात ठेवून सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा हा निर्दयी प्रकार घडत होता. सदरील प्रकारामुळे शुभम तरडे हे एकदम व्याकूळ झाले, त्यांनी दोन तीन वेळा डॉक्टर साहेब याना विनंती केली. परंतु डॉक्टर सेवाभाव विसरून अर्थ भाव जाणत असल्याने त्यांना काही पाझर फुटत नव्हता. शेवटी शुभम तरडे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते याना संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली.
रुग्णाची स्थिती वाईट आहे, हे लक्षात येताच श्री. मोहिते यांनी शहरप्रमुख शिवराज टोणपे, संघटक प्रणव सावंत, उपजिल्हा प्रसिध्दी प्रमुख सागर रायते, युवासेना अजय सावंत, माजी सैनिक प्रदीप सुतार यांच्यासह रुग्णालय गाठले. संबंधित डॉक्टरला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्टाईलने चांगलाच घाम फोडला. त्या नंतर संबंधित रुग्णाची व्यवस्था करण्यात आली.