लता दीदींचे डॉक्टर ‘पहा’ काय म्हणतात…

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने, त्या काल मुंबईतील आपल्या राहत्या घरी परतल्या आहेत. ब्रीच कॅंडी रुग्णालयात तब्बल 28 दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते परंतु काल घरी परतल्यानंतर लता दीदींनी ट्विटरद्वारे सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.

 

लता दीदी यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी जगभरातील त्यांचे चाहते प्रार्थना करत होते. त्यासोबतच ब्रीच कॅंडी रुग्णालयातील डॉक्टरांच्या मोठ्या टीमने अथक प्रयत्नांनी लता दीदींवर उपचार केले आणि त्यांना बरं केलं आहे. स्पॉटबॉय इ या इंग्रजी वेबसाइटने लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे प्रमुख डॉक्टर प्रतीत समदाननी यांची मुलाखत घेतली आहे.

 

संपूर्ण उपचारांविषयी सांगताना, डॉ. प्रतीत म्हणाले, “लता मंगेशकर यांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं होतं, तेव्हा त्यांना बरं करू हा विश्वास घरच्यांना देणं आमच्यासाठी फार कठीण होतं. खरं तर गेले 28 दिवस फार तणावात होते. पण मला याचा आनंद आहे की माझ्या टीमने त्यांच्यावर उपचार केले आणि त्या आता अगदी बऱ्या आहेत.”

 

दरम्यान, काल घरी परतल्यावर, लता मंगेशकर यांनी स्वतः ट्विट करत आपली प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले. त्या लिहितात, “गेल्या 28 दिवसांपासून मी ब्रीच कँडी रुग्णालयात होते. मला न्युमोनिया झाला होता. मी पूर्ण बरी होऊन घरी जावं ही डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले. देव, माई- बाबा यांचे आशीर्वाद, तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि प्रेमामुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सर्वांची आभारी आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here