उमरी गावांमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा वृद्ध महिलेसह बालिकेवर हल्ला, दोघींची प्रकृती गंभीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

परभणी तालुक्यातील उमरी या गावामध्ये, एका पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. या कुत्र्याच्या हल्ल्यांमध्ये गावातील ६८ वर्षीय महिलेसह, सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी घडली. जिल्हातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. मागील महिन्यात पाथरी तालूक्यातील वाघाळा गावात ८ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावे घेतल्याची घटना ताजी असताना आता परभणी तालुक्यातील उमरी गावातही पिसाळलेल्या कुत्र्याने चावे घेतले आहेत.

सदरील गावात मागील काही दिवसापासून पिसाळलेले कुत्रे फिरत होतं, त्याने गावात राहणाऱ्या लक्ष्मीबाई समिंद्रे यांच्यावर हल्ला केला. त्याच्यापासून सुटका करून घेत असतानाच, कुत्र्याने त्यांच्या चेहऱ्याचा चावा घेत, गाल आणि कपाळाचे अक्षरशः लचके तोडले आहेत. या घटनेमध्ये लक्ष्मीबाई गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. तर गावातच राहणाऱ्या एका सहा वर्षीय बालिकेवरही, याच कुत्र्यांन हल्ला केला असून, हल्ल्यात या बालिकेची प्रकृती गंभीर बनली आहे. प्रकृती गंभीर बनल्यामुळे उपचारासाठी तिला नांदेड येथे हलविण्यात आल आहे. या प्रकारामुळे गाव आणि परिसरामध्ये दहशतीचं वातावरण तयार झाले असून, पिसाळलेल्या कुत्र्याला पकडणे गरजेचे बनले आहे.