Dog Birthday In Pune University : बड्डे आहे भावाचा ; जल्लोष साऱ्या गावाचा !!!

Dog Birthday In Pune University
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | Dog Birthday In Pune University :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट असं आपण म्हणतो.याच ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट मध्ये एक अनोखा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या लाडका असलेला ‘खंडू’ नावाच्या श्वानाचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

या वाढदिवसाठी तीन दिवसांपूर्वी मोठा फ्लेक्स लावण्यात आला होता. सोशल मीडियावरून त्याची जोरदार प्रसिद्धी देखील करण्यात आली होती.त्यानंतर मोठा केक कापून फटाके फोडून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यामुळे ‘खंडू’ ची सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. Dog Birthday In Pune University

पुणे विद्यापीठात ‘खंडू’ चांगलाच प्रसिद्ध आहे.याआधी देखील त्याने विद्यापीठातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांपासून वाचवले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचा या ‘खंडू’वर विशेष प्रेम आहे.पुणे विद्यापीठाचा ‘जिगरबाज’, ‘धाडसी’ आणि ‘कर्तव्यदक्ष’, अशी या खंडूची ओळख आहे. त्यामुळे त्याचा वाढदिवस सगळ्या विद्यार्थ्यांनी जल्लोषात साजरा करण्याचं ठरवलं होतं. विद्यार्थ्याने असा अनोखा वाढदिवस साजरा केल्यामुळे विद्यापीठात देखील चांगलीच चर्चा रंगली. खंडूने अनेकदा विद्यार्थ्यांची मदत केली आहे.विद्यापीठाचा परिसर दाटीवाटीत असल्याने तिथे कायम साप आढळतात.अनेक विद्यार्थ्यांना संर्पदंशही झाला आहे.मात्र खंडू च्या सतर्कतेमुळे सर्पदंश याचा धोका कायम टळला आहे. Dog Birthday In Pune University

तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांनी वसतीगृहात हा खंडू आणला होता. त्यानंतर त्यांचे मित्र विनोद वाघ, योगेश सोनावणे आदींनी खंडूचा सांभाळ केला.गेले तीन वर्ष झाले हे सगळे खंडूचा वाढदिवस जल्लोषात साजरा करत आहेत.शेंबटवाड हे सध्या चंद्रपूर जिल्ह्यात तहसिलदार आहेत.तर विनोद वाघ आणि योगेश सोनावणे हे विद्यापीठातचं वास्तव्याला आहेत.त्यामुळे या सगळ्यांचे खंडू कडे विशेष लक्ष असतं.विनोद वाघ म्हणाले की “एखाद्या दिवशी विद्यापीठात येऊन खंडूची भेट झाली नाही तर काहीतरी चुकल्यासारखं होतं.त्यामुळे माझा दिनक्रम कितीही व्यस्त असला तरी मी ‘खंडू’ची भेट आवर्जुन घेतो.तर योगेश सोनावणे म्हणाले की “खंडू हा आमच्या विद्यापीठीय जीवनात महत्त्वाचा घटक होऊन गेला आहे.एका अर्थाने आमच्या मित्र परिवारातील तो एक घटक आहे. Dog Birthday In Pune University

अशा या ‘खंडू”चा सगळ्यांनाच लळा लागला आहे.

हे पण वाचा :

Personal Finance : आता खिसा होणार रिकामा, जूनमध्ये केले जाणार ‘हे’ 5 आर्थिक बदल !!!

Petrol-Diesel Price : राज्य सरकारांकडून पेट्रोल-डिझेलमध्ये आणखी कपात केली जाणार ???

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवीन भाव तपासा

SIP मध्ये अशा प्रकारे गुंतवणूक करून मिळवा कोट्यवधी रुपये !!!

Stock Market : IT शेअर्समध्ये गुंतवणूक करताय… जरा थांबा !!! तज्ञ काय म्हणतात ते पहा