धक्कादायक! नराधमांनी केला चक्क कुत्र्यावरतीच बलात्कार

0
62
Dog Raped in Mumbai
Dog Raped in Mumbai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सगळीकडे बलात्काराच्या घटना सातत्याने समोर येत असताना मुंबईत किळसवाणा प्रकार घडला आहे. चार नराधमांनी चक्क कुत्र्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मालाड च्या मालवणी भागात घडल्याचे समोर आले आहे. यामुळे मालाड आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. क्रूरतेचा कळस म्हणजे आरोपी कुत्र्याला रक्तबंबाळ अवस्थेत सोडून पळून गेले आहेत. सध्या या कुत्र्यावर उपचार सुरु आहेत.

हाती आलेल्या माहीतीनुसार, मालवणी परिसरातील स्थानिक सुधा फर्नांडिस या नेहमी कुत्र्यांना खाऊ घालतात. मात्र या कुत्र्याला नेहमीप्रमाणे खाऊ घातला असता, तो कुत्रा विव्हळत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तो कोणालाही स्पर्श करु देत नव्हता. यादरम्यान एका रिक्षा चालकाने फर्नांडिस यांना दिलेली माहिती अतिशय क्लेषकारक आणि धक्कादायक होती. चार जणांनी या कुत्र्यावर बलात्कार केल्याचं रिक्षा ड्रायव्हरने फर्नांडिस यांना सांगितलं. “आरोपींनी कुत्र्याचे पाय बांधले होते, कुत्रा ओरडत होता, त्यामुळे आपल्याला हा प्रकार समजला. आरोपींचा विकृतपणा रोखण्यासाठी आपण गेलो असता आरोपी पळून गेले असं रिक्षाचालकाने फर्नांडिस यांना सांगितलं. दरम्यान, फर्नांडिस यांनी या सर्व प्रकारानंतर मालाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे

“पीडित कुत्रा दिवसभर बेपत्ता होता. तो मालवणी परिसरातील चर्च परिसरात आढळला. तो रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. त्याच्या गुप्तांगालाही दुखापत झाली आहे. या कुत्र्यावर प्रचंड मानसिक आघात सुद्धा झाला आहे. त्याच्याजवळ कोणी गेलं किंवा त्याला स्पर्श केला तर तो जोरजोरात ओरडून घाबरुन चावा घेत होता”, असं ‘अॅनिमल मॅटर टू मी’ या संस्थेच्या डॉ अंकिता पाठक यांनी सांगितलं. कुत्र्याच्या पुढच्या पायांना जखम झाली आहे. सध्या डॉक्टर पीडित कुत्र्यावर उपचार करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here