टीम हॅलो महाराष्ट्र। भारतात रस्ते सुरक्षतेबाबतचे नियम पाळतांना लोकांमध्ये उदासीनता नेहमीच दिसून येते. विशेषकरून दुचाकी चालवतांना हेल्मेट न वापरणे ही तर चालकांसाठी जिवापेक्षा अभिमानाची गोष्ट आहे. वाहतूक पोलीसांनी कितीही सक्ती केली तरी रस्त्यावर विना हेल्मेट दुचाकी चालवणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अशाच तोऱ्यात बरेच जण वागतात. असं सगळं असतांना सोशल मीडियावर व्हायरल झालेला विडिओ विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांना शिकवण देणारा आहे.
या व्हिडिओत एका हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वाराच्या मागे एका कुत्र्यानं चक्क हेल्मेट घातलेलं दिसत आहे. कुत्र्याने हेल्मेट घातल्याच्या या व्हिडिओने रस्ते सुरक्षा नियम पाळण्याबाबत एक चांगलं उदाहरणं ठेवलं आहे. ट्विटरवरील एका युझरने याबाबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. गाडीच्या नंबर प्लेट वरून हा व्हिडीओ तामिळनाडूमधील असल्याचा समजते. हा व्हिडिओ अनेकांनी रिट्विट करत दुचाकी चालवताना हेल्मेट वापरणे गरजेचे आहे, हे कुत्र्याला काळत तर आपल्याला का नाही अशा आशयाच्या भावना शेयर केल्या. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
Dog wearing helmet for safety in Tamilnadu..
Really admiring the owner’s care..❤❤ pic.twitter.com/pmEvwf2Dq4
— Pramod Madhav (@madhavpramod1) January 7, 2020