Wednesday, October 5, 2022

Buy now

वन्यप्राणी बिबट्याला कुत्र्यांनी शेताकडेला आणून खाल्ले

 कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील बाजे- रासाटी येथे मालकी क्षेत्रात वन्यप्राणी बिबट्या मेलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अंदाजे 10 ते15 दिवस जुने सडलेल्या अवस्थेत बिबट्याचे शव मिळून आला आहे. सदर सडलेले मृत बिबट्यास भटक्या कुत्र्यांनी शेताकडेला आणून खाल्याचे निदर्शनास आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल बुधवारी दि. 16 रोजी मौजे बाजे- रासाटी येथे रात्री 8.30 वाजता मृत बिबट्या आढळून आला. बिबट्याला कोणत्यातरी भटक्या कुत्र्यांनी ओडून शेताकडेला आणून खाल्याचे दिसून आले.
घटनास्थळी वनक्षेत्रपाल हेळवाक संदिप जोपळे व सह्यायक वनसंरक्षक तुषार ढमढेरे यांनी पंचनामा करून तातडीने पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कडून शविच्छेदन केले.

सदरील बिबट्याचे दहन करण्यात आले आहे. मृत बिबट्याची सर्व पायांची नखे व दात हे सुस्थितीत होते, कातडे हे सडलेले होते. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने काही अनुचित प्रकार घडला नसल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत असल्याचे वनविभागाने सांगितले. पुढील तपास वनक्षेत्रपाल संदीप जोपळे करीत आहेत.