Dombivli News : डोंबिवली स्थानकामध्ये घडलेला एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. एवढेच नाही तर ही चर्चा अगदी राजकीय गटामध्ये सुद्धा पसरली आहे. नक्की काय झालं आहे ? तर डोम्बिवली स्थानकामध्ये एक प्रवाशाला गुजराती (Dombivli News) भाषेमध्ये प्रिंट केलेलं तिकीट मिळाले असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. त्यामुळे मराठमोळ्या डोंबिवलीत गुजराती भाषेतील तिकीट कसं ? याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. चला जाणून घेऊयात काय आहे हे नेमके प्रकरण ?
डोम्बिवली स्थानकांमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. एका प्रवाशाला डोम्बिवली स्थानकामध्ये (Dombivli News) एक तिकीट मिळाले असून त्यावरच मजकूर गुजराती भाषेमध्ये छापला गेला आहे. असा दावा प्रवाशांनी केला आहे. हे तिकीट ८ मार्च रोजीचे असून डोंबिवली ते घाटकोपर दरम्यानचे हे तिकीट आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा रंगली आहे. गुजराती भाषेतील या तिकिटाविषयी काही नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
काय आहे रेल्वेचे म्हणणे ? (Dombivli News)
दरम्यान या तिकिटाबाबत माहिती देताना रेल्वेने म्हंटले आहे की तिकीट प्रिंट करणाऱ्या यंत्रात बिघाड झाल्याने असे तिकीट (Dombivli News) प्रवाशांना मिळाले असावे, तसेच हे तिकीट गुजराती भाषेत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
राजकीय पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा यावर प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. गुजराती भाषेतील (Dombivli News) तिकीटामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरकारवर टीका करत आहेत. तर, भाजप आणि महायुतीचे समर्थक हे मात्र, ते तिकीट गुजराती भाषेत नसल्याचा दावा करत आहेत.