हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Donald Trump Property In India । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरु केले आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाने अनेक देशाची चांगलीच पंचाईत झाली आहे. टॅरिफ वॉरचा फटका भारताला देखील बसला आहे. भारतावर तब्बल ५० टक्के आयात शुल्क लावत ट्रम्प यांनी भारतीयांचा रोष अंगावर घेतला आहे.
मीच कसा शहाणा हे देखील दाखवण्याचा प्रयत्न ट्रम्प करताना दिसत आहेत. एका बाजूला भारतीय अर्थव्यवस्था मृत म्हणणारे, भारताला सतत धमक्या देणारे आणि भारतीयांचा राग अंगावर घेणाऱ्या याच ट्रम्प यांची भारतात प्रचंड संपत्ती आहे. याचाच अर्थ एकीकडे भारताला नावे ठेवायची आणि बाजूला भारतात पसरलेल्या उद्योगातून कोट्यवधींची कमाई करायची अशी दुपट्टी भूमिका ट्रम्प घेत असल्याचे दिसत आहे.
भारतात सर्वात आधी पुण्यामध्ये ट्रम्प यांनी बांधकाम क्षेत्रात गुतंवणूक केली .२०१२ साली पुण्यातील पंचशील रिअल्टी या कंपनीसोबत व्यावसायिक भागीदारीतून ट्रम्प टॉवरची उभारणी केली. २३ मजली २ टॉवर असलेले ट्रम्प टॉवर हे २०१५ मध्ये हे तयार झाले. या प्रकल्पाचा खर्च अदाजे ३०० कोटी रूपये इतका आहे. तर, मुंबई वरळीमध्ये, लोढा ग्रुप आणि ट्रम्प यांच्या भागीदारीतून २०१३ मध्ये ७६ मजली टॉवरचे काम सुरु झाले आणि २०२१ मध्ये पूर्ण झाले. हा प्रकल्प खर्च ३,००० कोटी रूपये इतका आहे. तर कोलकाता ३८ मजली निवासी टॉवर, ईएम बायपासवर, त्रिबेका, उनिमार्क आणि आरडीबी ग्रुप सोबत भागीदारी करून ट्रम्प टॉवर्स उभा केले आहे. हा प्रकल्प जून २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.प्रकल्पाचा खर्च हा अंदाजे ४०० कोटी रुपये आहे.Donald Trump Property In India
दिल्लीतही ट्रम्प टॉवर- Donald Trump Property In India
देशाच्या राजधानीत सुद्धा ट्रम्प टॉवर्स उभारले गेले आहे. दिल्ली एनसीआर, गुरुग्राम मध्ये त्रिबेका आणि एम३एम ग्रुपने सेक्टर ६५ मध्ये दोन ४७ मजली टॉवर उभा केले जात असून, २०२६ हा प्रकल्प पूर्ण होईल होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्प खर्च रु. १,९०० कोटी रूपये इतका आहे. म्हणजेच काय तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात बांधकाम क्षेत्रातून कोट्यवधी पैसा कमावला आहे.
अगदी अलीकडे नोव्हेंबर २०२४ मध्ये दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतामध्ये आपली गुंतवणूक आणखी वाढवली. भारतातील भागिदारी ट्रायबेका डेव्हलपर्ससह गुरुग्राम, पुणे, हैदराबाद, मुंबई, नोएडा आणि बेंगळुरूमध्ये किमान सहा प्रकल्पांची घोषणा केली. तब्बल ८० लाख चौरस फुटांचा रिअल इस्टेट विकास होणार आहे. या प्रकल्पातून ट्रम्प यांना मोठा आर्थिक फायदा झाला आहे.




