Donald Trump Tariff On India : ट्रम्प यांचा भारताला मोठा दणका; 26 टक्के कराची घोषणा

Donald Trump Tariff On India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Donald Trump Tariff On India । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा दणका दिला आहे. अमेरिकेने भारतावर 26 टक्के डिस्काऊंटेड रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. तसेच कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या चीनवर सुद्धा अमेरिकेने तब्बल 34 टक्के आयात शुल्क आकारले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम जगभरातील व्यापारावर होणार आहे. तसेच ट्रम्प यांच्या टेरिफ टॅक्स मुळे काही क्षेत्रांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.

भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणे महागात- Donald Trump Tariff On India

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अलीकडेच अमेरिकेत आले होते. ते माझे चांगले मित्र आहेत. या दौऱ्याच्यावेळी मी पंतप्रधान मोदींना बोललो, तुमचा आमच्यासोबतच व्यवहार योग्य नाहीय. भारत अमेरिकेकडून 52 टक्के टॅरिफ वसूल करतो. म्हणून आम्ही त्यांच्यावर निम्मा 26 टक्के कर लावणार आहोत”. भारत आणि अमेरिकेतील व्यापार आधीच अनेक मुद्द्यांवरून तणावपूर्ण आहे. या आयात शुल्कामुळे (Donald Trump Tariff On India) भारतीय कंपन्यांना अमेरिकेत व्यवसाय करणे महागात पडू शकते. परंतु ट्रम्प यांचा दावा आहे कि या आयात शुल्कामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित केले जाईल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनुसार आता अमेरिका चीनकडून 34 टक्के, युरोपियन युनियनकडून 20 टक्के, जपानकडून 24 टक्के, दक्षिण कोरियाकडून 25 टक्के, स्वित्झर्लंडकडून 31 टक्के, युनायटेड किंग्डमकडून 10 टक्के, तैवानकडून 32 टक्के, मलेशियाकडून 24 टक्के आणि भारताकडून 26 टक्के टॅरिफ वसूल करणार आहे.

अमेरिकेच्या या धाडसी निर्णयाचा परिणाम प्रामुख्याने कृषी, मौल्यवान खडे, रसायने, औषधनिर्माण, वैद्यकीय साहित्य निर्मिती, इलेक्ट्रिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्रांची निर्मिती या क्षेत्रांचा समावेश असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या उद्योगांवर ट्रम्प प्रशासनाकडून अतिरिक्त आयात शुल्क आकारले जाऊ शकते. एक्सपर्ट्सनुसार भारताच या टॅरिफमुळे मोठं नुकसान होणार नाही. भारताच्या निर्यातीत 3 ते 3.5 टक्के घसरण होऊ शकते. निर्माण आणि सेवा क्षेत्रातील वाढत्या निर्यातीमुळे हा प्रभाव कमी होईल.