हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदाबादमधील नियोजित कार्यक्रम आटोपून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आग्र्यातील ताजमहाला भेट देण्यासाठी पोहचले होते. यावेळी आग्रा विमानतळावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्रम्प यांचे स्वागत केले. राजशिष्टचाराचा भाग म्हणून उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल सुद्धा यावेळी विमातळावर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी हजर होत्या.
Uttar Pradesh: US President Donald Trump and First Lady Melania Trump received by UP Governor Anandiben Patel and Chief Minister Yogi Adityanath in Agra. pic.twitter.com/d53DDzMi35
— ANI (@ANI) February 24, 2020
यानंतर ट्रम्प यांनी आपली पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका, जावई जेअर्ड कुशनर यांच्यासह ताजमहालला भेट दिली. या भेटीत ताजमहालच्या संपूर्ण परिसर ट्रम्प यांनी आपली पत्नी मेलेनियासोबत न्याहाळला. ताजमहालविषयी माहिती देण्यासाठी त्यांना एक गाइडसुद्धा उपलब्ध करून देण्यात आला होता.
Agra: US President Donald Trump and First Lady Melania Trump at the Taj Mahal. pic.twitter.com/BDZVQbHJ2T
— ANI (@ANI) February 24, 2020
US President Donald Trump’s message in the visitor’s book at the Taj Mahal- “Taj Mahal inspires awe, a timeless testament to the rich and diverse beauty of Indian culture! Thank you, India”. pic.twitter.com/QtD87OeiYk
— ANI (@ANI) February 24, 2020
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ताजमहाल येथील भेटीत अभ्यागत पुस्तिकेत एक संदेश सुद्धा लिहिला. “ताजमहाल विस्मयकारक, भारतीय संस्कृतीच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सौंदर्याचा एक शाश्वत करार आहे, धन्यवाद भारत”, असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात लिहलंआहे. ताजमहालच्या आवारात चोख सुरक्षा बंदोबस्त पाहायला मिळाला.
#WATCH US President Donald Trump and First Lady Melania Trump at the Taj Mahal in Agra. pic.twitter.com/hoPx0M8kAd
— ANI (@ANI) February 24, 2020
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.