हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशभरातील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणून शिर्डीच्या साईबाबा मंदिराची ओळख आहे. दरवर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर लाखोंपेक्षा जास्त भाविक मंदिरात दान करतात. यावर्षी देखील भक्तांकडून साई मंदिरासाठी भली मोठी रक्कम दान करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात तब्बल 17 कोटी 50 लाख 56 हजार 086 इतकी भरघोस रक्कम शिर्डीतील साईबाबा मंदिरात भक्तांनी अर्पण केली आहे. मुख्य म्हणजे, ही रक्कम फक्त 10 दिवसांच्या काळात मंदिराच्या दानपेटीत जमा झाली होती.
यंदाच्या दिवाळीत असंख्यभक्तांनी साईबाबांचे दर्शन घेतले. त्यामुळे दिवाळी उत्सवात तब्बल 17 कोटी 50 लाख 56 हजार 086 इतकी रक्कम मंदिराच्या दानपेटीत जमा झाली आहे. यावरून आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो की या दहा दिवसात साईबाबांच्या चरणी दररोज पावणेदोन कोटी रुपये अर्पण करण्यात येत होते. याबाबतची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिली आहे.
अशा पद्धतीने रक्कम झाली जमा
साईबाबा मंदिरात करण्यात आलेल्या दानामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या देण्यांचा समावेश आहे. अधिकारी पी. शिवा शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर ते 20 नोहेंबरमध्ये मंदिरात 17 कोटी 50 लाख 56 हजार 086 एवढी रक्कम दान करण्यात आली. यामध्ये रोख रक्कम 7 कोटी 22 लाख 39 हजार 794 रुपये इतकी होती. तसेच, देणगी काऊंटरवर 3 कोटी 98 लाख 19 हजार 348 रुपये दान करण्यात आले. तर, पी.आर.ओ.सशुल्क पास देणगीमध्ये 2 कोटी 31 लाख 85 हजार 600 रूपये भक्तांनी देणगी म्हणून दिले. इतकेच नव्हे तर, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक डी. डी. देणगी, मनी ऑर्डरच्या माध्यमांतून 3 कोटी 70 लाख 94 हजार 423 रूपये जमा झाले.
सोने चांदी अर्पण
साईबाबा मंदिरात रोख रकमेसह सोन्या-चांदीचे देखील दान करण्यात आले आहे. यावर्षी दिवाळीच्या काळात 810 ग्रॅम सोने म्हणजेच 22 लाख 67 हजार 189 रक्कम झाली झाली आहे. तसेच, चांदी 8211.200 म्हणजेच 4 लाख 49 हजार 731 जमा झाली आहे. दिवाळी उत्सवाच्या काळात फक्त तीन दिवसांमध्ये विविध स्वरूपात मंदिरामध्ये चार कोटी नऊ लाख रुपयांचे दान करण्यात आले होते. विविध स्वरूपातून प्राप्त झालेली रक्कम मिळून हा आकडा 17 कोटी 50 लाख 56 हजार 086 एवढा आहे.