क्रूरपणाचा कळस!! दरवर्षी 60 लाख गाढवांची होते कत्तल; ‘या’ कारणासाठी घेतात मुक्या प्राण्याचा जीव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। जगभरात विविध भागात विविध जमातीचे लोक विविध प्रकारचे पदार्थ खातात. यांपैकी काही लोक पूर्ण शाकाहारी, तर काही लोक पूर्ण मांसाहारी आहेत. शाकाहारी लोकांच्या आहारामध्ये भाजीपाला, फळ, दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असतो. तर मांसाहारी लोकांच्या आहारात विविध प्राण्यांचे मांस खाल्ले जाते. मांसाहार करणारे लोक कोंबडी, बकरा अशा प्राण्यांचे मांस खातात. तर काही लोक कासव, बेडूक, माकड अशा प्राण्यांचेदेखील मांस खातात.

अनेक प्राणी विविध पद्धतीने माणसाच्या उपयोगी पडतात. काही प्राणी माणसाला दळणवळणात तर काही प्राणी माणसाला उत्पन्न मिळवून देण्यात फायदेशीर ठरतात. यामध्ये गाढव या प्राण्याचासुद्धा समावेश आहे. अनेक भागात आजही दळणवळणासाठी आणि मोठमोठी ओझी लादून नेण्यासाठी गाढवाचा वापर केला जातो. मात्र या स्वार्थी जगात काही लोक गाढवापासून फायदा मिळवण्यासाठी त्याला जीवे मारतात. होय. हे खरं आहे. मुख्य आणि धक्कादायक बाब अशी की, गाढवांना खाण्यासाठी नव्हे तर त्यांच्यापासून औषध मिळवण्यासाठी त्यांची कत्तल केली जाते.

विशेषतः चायनीज औषधांची मागणी पूर्ण करण्यासाठी गाढवांची सामुहिक हत्या केली जाते, असे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. एका वृत्तानुसार, दरवर्षी सुमारे ६० लाख गाढवांना अत्यंत खूरपणे मारले जाते. या वृत्तात असाही दावा करण्यात आला आहे की, चीनमध्ये गाढवांच्या संख्येत मोठी घट झाल्यानंतर त्यांच्या कातडीशी संबंधित उद्योग आता आफ्रिकेत वळू लागले आहेत. उद्योग धंद्यासाठी गाढवांचा अत्यंत निर्दयीपणे बळी दिला जात आहे. ही अत्यंत वाईट बाब आहे.

गाढवापासून औषध निर्मिती

एका वृत्तानुसार, गाढवापासून तयार केलेलं औषध हे लिंग वाढवण्यासाठी मदत करतं असल्याचा दावा एका परदेशी शास्त्रज्ञाने केला आहे. या औषधाबद्दल बोलायचं झालं तर, चीनमध्ये अनेक दशकांपासून या औषधाचा वापर केला जात असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे जेव्हापासून या औषधाचे फायदे जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले आहेत तेव्हापासून याची मागणी वाढली आहे. यासाठी चीनमध्ये गाढवांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जात आहे. गेल्या काही काळात चीनमध्ये गाढवांचे प्रमाण फार कमी झाल्याचे दिसून आले आहे.

गाढवांच्या तस्करीत वाढ

गाढवापासून बनवले जाणारे हे औषध त्याच्या त्वचेतून मिळणाऱ्या जिलेटिन पासून बनवले जाते. त्यामुळे गाढवाची कत्तल करून त्याच्या कातडीचा मोठा काळा बाजार सुरू आहे. गाढवाच्या कातडीपासून तयार होणाऱ्या या औषधाला जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे गेल्या काही काळात गाढवांच्या तस्करीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, चीन आणि पाकिस्तानमध्ये गाढव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. खरंतर गेल्या १० वर्षांपासून पाकिस्तान वर्षाला लाखो गाढवांची कत्तल करून त्यांच्यापासून कमाई करत आहे. केवळ पैशाच्या लालसेपोटी हे लोक गाढव हा प्राणी चीनला विकत आहेत. मात्र आता पाकिस्तानमध्येच गाढव नष्ट होऊ लागल्याने चीनमध्ये व्यवसायाच्या दृष्टीने मोठी अडचण निर्माण होत आहे.