हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशाची स्थापना केली की सर्वात प्रथम त्याची आरती करणे अनिवार्य मानले जाते. स्थापना करूनही गणरायाची पूजा केली नाही तर त्या स्थापनेला काहीही अर्थ नसतो. यामुळेच स्थापना केल्यानंतर सर्वात अगोदर गणेशाची पूजा करण्यात येते. घरात गणेशाची स्थापना झाली की घरातील वातावरण प्रसन्न होते. तसेच घरात आनंद नांदू लागतो. परंतु गणेश चतुर्थीच्या या काळात काही नियमांचे पालन करणे अनिवार्य असते. आज आपण हेच महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत.
1) पावित्र्य जपा – गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाची पूजा करताना त्या पूजेचे पावित्र्य जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कधीही गणेशाची पूजा करताना सर्वात प्रथम स्वच्छ आंघोळ करून, धुतलेले चांगले कपडे घालून मगच पूजेला बसावे. तुम्ही जर भक्तीभावाने गणेशाची पूजा केली तर तुमच्या घरात सुख शांती टिकून राहील.
2) मंदिराची साफसफाई – गणेशाच्या पूजेपूर्वी सर्वात प्रथम ज्या ठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली आहे किंवा करायचे आहे ती जागा स्वच्छ करावी. त्या जागेत कोणतीही घाण राहणार नाही किंवा अस्वच्छता दिसेल अशा गोष्टी करू नये. असे केल्याने मंदिराच्या आवारात प्रसन्नता टिकून राहील.
3) तुळस अर्पण करू नये – गणेशाच्या पूजेवेळी त्याला तुळस कधीही वाहू नये. तसेच गणेशाचा प्रसाद बनवताना देखील त्यामध्ये तुळशीचा वापर केला जाऊ नये. या गोष्टीची सर्वात प्रथम काळजी घ्यावी.
4) काळा रंग टाळावा – हिंदू संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो. त्यामुळे गणेशाच्या स्थापनेवेळी आजूबाजूला काळा रंग ठेवू नये.. किंवा गणरायासाठी डेकोरेशन करताना देखील काळ्या रंगाचा वापर टाकावा.
5) सात्विक भोजन – जोपर्यंत गणपती बाप्पा घरात आहेत तोपर्यंत घरात सात्विक अन्न शिजवावे. तसेच कोणतेही मांसाहरी पदार्थ घरात आणून आहेत. हिंदू संस्कृतीत प्राण्यांची हत्या करणे मोठे पाप मानले जाते. त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात घरात फक्त सात्विक अन्न बनवून जेवायला घालावे.
तुम्ही जर गणेश चतुर्थीच्या काळात अशा बारीक लहानसहान गोष्टींचे पालन केले नाही तर तुम्हाला पूजेचा लाभ मिळणार नाही. कोणत्याही देवी देवतांची पूजा करताना काही विशिष्ट नियमांचे पालन करणे आवश्यक असते. त्यामुळे या नियमांचे चुकून जरी आपल्याकडून उल्लंघन झाले तर अनर्थ देखील होऊ शकतो.