शरीरातील अचानक दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; व्हाल गंभीर आजाराचे शिकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | लोकांची जीवनशैली बदलल्याने त्यांना होणारे अनेक आजार आणि समस्या देखील बदललेल्या आहेत. शरीरात कोणताही आजार होण्याआधी आपले शरीर आपल्याला काही संकेत देत असतात. परंतु आपण त्या अगदी सामान्य आहे, असे समजून त्याकडे निष्काळजीपणाने दुर्लक्ष करत असतो. तसेच त्यांना अगदी किरकोळ समजतो. नंतर हळूहळू तेच पुढे जाऊन एक गंभीर रूप धारण करते. त्यामुळे जर तुमच्या शरीरात काही अस्पष्ट आणि हळूहळू काही बदल दिसत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अन्यथा पुढे जाऊन तुम्हाला मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. आता ही लक्षणे नक्की कोणती आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

वजन कमी होणे

जर तुमचे वजन अचानक झपाट्याने कमी होत असेल, तर ते देखील तुमच्या शरीरासाठी घातक आहे. कारण अचानक वजन कमी होणे. हे मधुमेह, थायरॉईड आणि डिसऑर्डर किंवा कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचे लक्षण देखील असू शकते. तसेच स्ट्रेस डीसऑर्डर, बुलीमिया यांसारख्या समस्यांमुळे देखील वजन कमी होते. त्यामुळे जर अशी लक्षणे दिसत असेल, तर तुम्ही अजिबात वेळ वाया न घालवता. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यावर उपचार सुरू करा.

श्वास घेण्यास त्रास होणे

तुम्ही अगदी हलके काम केले, असेल आणि तरीदेखील तुम्हाला धाप लागत असेल, किंवा दम लागत असेल तर हे एका गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. जर एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये ही समस्या उद्भवत असेल, तर त्याला दमा देखील होऊ शकतो. तसेच बुरशीजन्य संसर्गामुळे देखील श्वास घेण्यास त्रास होतो. त्याचप्रमाणे श्वास घेण्यास त्रास होत असेल तर नंतर जाऊन याचे रूपांतर हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांमध्ये होतो. त्यामुळे जर तुम्हाला सारखी धाप लागत असेल, तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा.

सातत्याने संक्रमण

जर तुम्हाला सारखे इन्फेक्शन होत असेल आणि एखादी जखम झालेली की, जर लवकर बरी होत नसेल. घसा खवखवत असेल तसेच खूप दीर्घ काळापासून जर खोकला असेल तर याकडे देखील दुर्लक्ष करू नका. कारण पुढे जाऊन यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. तसेच शरीरात पौष्टिकतेची कमतरता आणि अशक्तपणा असल्यामुळे या समस्या उद्भवतात. तसेच एचआयव्ही देखील याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा दाखवू नका.

निद्रानाश

रात्री नीट झोप न लागणे हे देखील एका गंभीर समस्येचे लक्षण असू शकते, जर तुम्ही झोप कमी घेतली तर तुमचा मूड चांगला राहत नाही. चिडचिडेपणा येतो. आणि हृदयाच्या संबंधित समस्या देखील निर्माण होतात. तुम्हाला जर जास्त प्रमाणात तणाव असेल तरी देखील निद्रा नाशाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर रात्री नीट झोप लागत नसेल, तर लवकर वेळेतच तज्ञांचा सल्ला घ्या. अन्यथा ती व्यक्ती नंतर जाऊन नैराश्याची शिकार होऊ शकते.