राज्यात शांतता तेव्हा कोण काय बोलते, ट्विट करते याकडे लक्ष देवू नका : शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

लोक शांतता पाळत आहेत, कुणाच्या तरी ट्विटकडे अन् कुणाच्या तरी प्रश्नाकडे विनाकारण महत्व देवू नका. सातारा जिल्ह्यात सर्वांनी सलोखा राखला आहे. त्यामुळे कोण काय बोलते आहे, काय ट्विट करतायत याकडे माध्यमांनी लक्ष देवू नये, असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

सातारा येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. अजित बोऱ्हाडे यांच्यासह शहरातील आढावा घेतला. तसेच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा शहरातील परस्थितीची पाहणी करत राजपथावरील शाही मज्जिद येथे सर्व धर्मीय सलोखा बैठक घेतली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रशासनाला व राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले होते. दोन्ही समाजामध्ये सलोखा ठेवण्याचे काम केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोणीही असंतोष झालेला नाही. दोन्ही समाजातील लोकांना शांतता हवी आहे, कोणत्याही समाजाला शांतता बिघडेल अशी कृती करायची नाही. अशीच शांतता राज्यात राहील, ज्यांना कुणाला असंतोष निर्माण करायची आहे, त्याला कुठल्याही समाजातील लोकांकडून, समाजाकडून प्रतिसाद मिळत नाही. राज्यात शांतता राखण्याचे काम पोलिस दलाकडून केले जात असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Leave a Comment