सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात आज बर्निंग कंटेनरचा थरार पाहायला मिळाला. आज (रविवार) दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटात कंटेनरला भीषण आग लागली. यावेळी कंटेनरचे पेटते चाक पाठीमागे असलेल्या दुसऱ्या कंटेनरवर आदळल्याने त्यालाही आग लागली. या घटनेने खंबाटकी घाट हादरून गेला.
सुदैवाने या आगीत कोणी जखमी झाले नाही. महामार्ग पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच फौजदार पी. डी. घनवट, पोवार, पोलिस मनोज गायकवाड, कदम, डेरे, खंडाळा पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1211119553157017/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=2Rb1fB
कंटेनरला अचानक आग कशी लागली याबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाही. मात्र या घटनेमुळे काही वेळासाठी खंबाटकी घाटात वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती योग्य रित्या हाताळली.