IND VS SL : T-20 नंतर आता वन-डे मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज; कधी आणि कुठे होणार सामने?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात नुकतीच T- 20 मालिका पार पडली. हि मालिका (IND VS SL) टीम इंडिया 2-1 अशी जिंकली आहे. या मालिकेनंतर आता टीम इंडिया वन डे मालिका (IND VS SL) खेळणार आहे. या T- 20 मालिका विजयासह टीम इंडियाने वर्षाची दमदार सुरवात केली आहे. सोमवार 10 जानेवारी पासून आता वन-डे मालिकेला सुरुवात होणार आहे. पाच दिवसांच्या आत ३ सामने खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे हे सगळे सामने डे नाईट होणार आहेत.

या वन-डे मालिकेसाठी (IND VS SL) भारतीय संघात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात येणार आहे. टी 20 मालिकामध्ये भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आता हे वरिष्ठ खेळाडू वन-डे मालिकेसाठी संघात परतणार आहेत. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा तर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यांचा समावेश आहे. रोहित शर्मा या वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे श्रीलंका संघात जास्त बदल होणार नाहीत.

वन-डे मालिकेचे वेळापत्रक
भारत विरुद्ध श्रीलंका वन डे मालिकेतील (IND VS SL) पहिला सामना सोमवारी 10 जानेवारी रोजी दुपारी 1:30 होणार आहे. हा सामना गुवाहाटी येथील बालसपारा क्रिकेट स्टेडियम पार पडणार आहे. तर दुसरा क्रिकेट सामना 12 जानेवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डंन होणार आहे. तर तिसरा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड इंटरनेशनल स्टेडियमवर पार पडणार आहे.

कुठे पहाल सामना :
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणारी वन-डे मालिका (IND VS SL) स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या टीवी चैनल्सवर पाहता येणार आहे. तसेच या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण डिझनी+हॉटस्टार या अँपवर पाहता येणार आहे.

वन -डे मालिकेसाठी संघ :
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार) , केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, ईशान किशन, वाशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंह.

श्रीलंका संघ: दासुन शनाका, कुसल मेंडिस, चरिथ असलंका, अशान बंडारा, वानिंदु हसरंगा, अविष्का फर्नांडो, नुवानिंदु फर्नांडो, चामिका करुणारत्ने, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका, पाथुम निसंका, प्रमोद मदुशन, कासुन राजिथा, सादीरा समरविक्रमा, महीष तीक्षणा, जेफ्री वांदरसे, दुनिथ वेलालगे.

हे पण वाचा :
ग्राहकांना बँकांकडून मिळाली नवीन वर्षाची भेट
अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांना सरकारकडून भेट !!!
मुंबईत 1993 सारखा बॉम्बस्फोट होईल; पोलीस कंट्रोलला फोन
Doorstep Banking म्हणजे काय ???
AB Devilliers की Suryakumar Yadav? कोण आहे Best? शोएब अख्तर म्हणतो…