हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । e-PAN Card : सध्याच्या काळात पॅन कार्ड हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट्स बनले आहे. पॅन कार्ड शिवाय कोणत्याही प्रकारची आर्थिक कामे करता येणे आता जवळजवळ अशक्यच आहे. तसेच इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, बँक खाते उघडणे तसेच व्यवसाय सुरू करणे आणि प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणे यांसारख्या कामांसाठी आता ते अत्यावश्यक बनले आहे.
आता पॅनकार्डधारकांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून ई-पॅन कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा दिली जात आहे. जर आपलेही पॅन कार्ड हरवले असेल तर घाबरण्याची काही गरज नाही. कारण आता आपल्याला घरबसल्या e-PAN Card डाउनलोड करता येईल.
e-PAN Card हे पॅन कार्डच्या हार्ड कॉपीपेक्षा जास्त सुरक्षित मानले जाते. e-PAN Card हे पॅन कार्डची सॉफ्ट कॉपी आहे. हे एक प्रकारचे ई-पॅन कार्ड व्हर्च्युअल कार्ड आहे जे मोबाईलमध्ये ठेवता येईल… तसेच ई-पॅन कार्ड चोरीला जाण्याची भीती देखील नाही. त्याचबरोबर ई-पॅन कार्ड हे ई-व्हेरिफिकेशनसाठी देखील वापरता येईल.
e-PAN Card कसे डाउनलोड करावे ???
>> इन्कम टॅक्सची अधिकृत वेबसाइट https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html वर लॉग इन करा.
>> येथे e-PAN Card च्याऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुमचा पॅन नंबर टाका.
>> आता तुम्हाला आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. नंतर जन्मतारीख टाका.
>> त्यानंतर Terms and Conditions वर क्लिक करा.
>> दिलेल्या ठिकाणी रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक टाका.
>> आता रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर मिळालेला OTP भरा.
>> त्यानंतर Confirmation या पर्यायावर क्लिक करा.
>> त्यानंतर ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी शुल्क भरा.
>> हे UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करता येते.
>> यानंतर तुम्ही e-PAN Card डाउनलोड करू शकाल.
हे पण वाचा :
RBI : आता चलनी नोटांवर दिसणार नाही महात्मा गांधींचा फोटो ??? RBI ने म्हंटले कि…
Kapil Dev : ”जेव्हा धावांची गरज असते तेव्हा ते बाद होतात”, रोहित-कोहलीवर भडकले कपिल देव !!!
Business Idea : अशा प्रकारे फुलांच्या व्यवसायाद्वारे मिळवा भरपूर पैसे !!!