खाम नदीपात्रासाठी 50 कोटींचा डीपीआर सादर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – खाम नदीपात्राला गतवैभव मिळवून देण्यासाठी मागील वर्षभरापासून एक रुपयाही खर्च न करता विविध विकास कामे करण्यात येत आहेत. नदीपात्रातील पुढील टप्पे पूर्ण करण्यासाठी महापालिकेने 50 कोटी रुपयांचा डीपीआर काल राज्य शासनाला सादर केल्याची माहिती प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत खाम नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय मागील वर्षी घेतला. या कामासाठी पांडेय यांनी पुढाकार घेतला. महापालिका, स्मार्ट सिटी, छावणी परिषद, इकोसत्व, व्हेरॅक यासह सामाजिक संस्थांच्या विद्यमाने लोखंडी पूल परिसरात तब्बल सात किलोमीटर पर्यंत विविध विकास कामे करण्यात आली. खाम नदीपात्राची अवस्थांना आल्यासारखी झाली होती. शेकडो नागरिकांनी ड्रेनेजचे पाणी पात्रात सोडले होते. हजारो टन प्लास्टिक कचरा उचलण्यात आला. त्यानंतर नदीपात्राची रुंदीकरण केले. पिचिंग ची कामे करण्यात आली. पात्रात रंगरंगोटी वृक्षारोपण करण्यात आले 7 किलोमीटर अंतरापर्यंत नदीकाठचे रूप बदलले. आता उर्वरित विविध विकास कामांसाठी निधीची गरज आहे.

शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने 50 कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला. डीपीआर मध्ये मागणी केलेल्या निधीचे अर्थसंकल्पात तरतूद करावी लागणार असल्याचे प्रशासक पांडेय यांनी सांगितले.

Leave a Comment